Nagpur Crime: मामा उठला भाच्याच्या जीवावर, शुल्लक कारणावरून वाद; चाकूनं वार करत संपवलं

Uncle Kills Nephew: नागपुरात गुन्ह्यांचे सत्र सुरूच आहे. एकीकडे मामानं आपल्या भाच्याला चाकूनं हल्ला करत ठार केलं असून, तर दुसरीकडे जरीपटका स्मशानभूमितील व्यवस्थापकाची चाकूनंच हत्या करण्यात आली आहे.
Nagpur Crime
Nagpur CrimeSaam tv
Published On

नागपुरात गुन्ह्यांचे सत्र सुरूच आहे. एकीकडे मामानं आपल्या भाच्याला चाकूनं हल्ला करत ठार केलं असून, तर दुसरीकडे जरीपटका स्मशानभूमितील व्यवस्थापकाची चाकूनंच हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही घटनेनं नागपूर हादरून गेलं आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असून, या दोन्ही प्रकरणांमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मामा उठला भाच्याच्या जीवावर

कौटुंबिक शुल्लक कारणावरून मामाने एका भाच्याची खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना तहसील पोलिस ठाणे हद्दीतील गांधीबाग येथील घडली आहे. आरोपी मामाचे नाव बदनसिंग राठोड असून, मृत भाच्याचे नाव रवी राठोड असे आहे. तर दीपक असे मृत रवी राठोड याच्या भावाचे नाव आहे. अगदी शुल्लक कारणावरून मामानं एका भाच्याची हत्या तर दुसऱ्या भाच्याला जखमी केलं आहे.

Nagpur Crime
Beed crime : बीडचा बिहार झालाय? वर्षभरात 10 हजारांहून अधिक गुन्हे

मामा आणि दोन्ही भाच्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शुल्लक कारणारून मामा आणि दोन भाच्यांमध्ये बाचाबाची होत असायची. मात्र, वाद इतका टोकाला गेला की, आरोपी मामानं भाचा रवीवर चाकुनं जीवघेणा हल्ला केला. यात रवीचा जागीच मृत्यू झाला. रवीला वाचवण्यासाठी भाऊ दीपक धावून आला. त्याच्यावरही आरोपी मामानं चाकुने वार करत हल्ला चढवला. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत, पुढील तपास तहसील पोलिस करत आहेत.

Nagpur Crime
Dharashiv Crime: कोरियन सिंगर ग्रुपच्या भेटीसाठी ३ मुलींची भलतीच करामत; रचला स्वतःच्या अपहरणाचा कट

स्मशानभूमितील व्यवस्थापकाची हत्या

नागपुरात चाकूने वार करुन जरीपटका स्मशानभूमितील व्यवस्थापकाची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना मेकोसाबाग येथील प्रोस्टेट ख्रिश्चन स्मशानभूमित दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडलीय. एनॉन पियरजी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, रमेश शिंदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

रमेश शिंदे हे जरीपटका स्मशानभूमितील व्यवस्थापक होते. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त निकेतन कदम आणि जरीपटका ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग घटनास्थळी पोहोचले. तसेच सखोल तपास करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com