लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, गर्लफ्रेंडवर चाकूने सपासप वार; नागपूर हादरले

Married Man Stabs Girlfriend in Nagpur: नागपूरच्या गुमथी गावात तरुणीवर प्रेयकराकडून चाकूने प्राणघातक हल्ला. तरुणीवर मंदिरात पूजा करत असताना हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल.
Married Man Stabs Girlfriend in Nagpur
Married Man Stabs Girlfriend in NagpurSaam Tv News
Published On
Summary
  • नागपूरच्या गुमथी गावात तरुणीवर प्रेयकराकडून चाकूने प्राणघातक हल्ला.

  • लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकर रोशन सोनेकर संतापून हल्ला करतो.

  • तरुणीवर मंदिरात पूजा करत असताना हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल.

  • पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली असून तपास सुरू आहे.

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. संतापाच्या भरात प्रियकरानं प्रेयसीच्या गळ्यावर चाकू ठेवून वार केले आहेत. प्रियकराचं लग्न झालं होतं. त्यानंतर देखील प्रेयसीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवले होते. याकारणामुळे त्यानं बायकोला सोडचिठ्ठी दिली. मात्र, प्रेयसीनं लग्नास नकार दिल्यामुळे तिच्या गळ्यावर चाकू ठेवून प्राणघातक हल्ला केला. सध्या तिची प्रकृती गंभीर असून, रूग्णालयात उपचार सुरू आहे.

रोशन सोनेकर असं हल्ला करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथी गावातून उघडकीस आली आहे. रोशनचं २० वर्षीय तरूणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघांचं रिलेशनशिप सुरू होतं. मात्र, त्यानंतर रोशनचं लग्न झालं.

Married Man Stabs Girlfriend in Nagpur
माधुरी कोल्हापूरात परतणार! अखेर वादावर पडदा, अंबानींनीच काढला तोडगा

रोशनचं लग्न झाल्यानंतरही त्यानं प्रेयसीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवले. यानंतर त्याचे बायकोसोबत खटके उडाले. त्यानं बायकोला सोडचिठ्ठी दिली. काडीमोड घेतल्यानंतर त्यानं प्रेयसीसोबत संपर्क कायम ठेवला. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी तो दारूच्या व्यसनाधीन गेला. प्रेयसीला त्रास देणे, मारहाण करणे असा प्रकार सुरू होता.

Married Man Stabs Girlfriend in Nagpur
राज्यात पावसाचा लपंडाव! कुठे कोसळधार तर, कुठे उन्हाचे चटके; कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

याच त्रासाला कंटाळून प्रेयसीनं प्रियकरासोबत लग्न करण्यास नकार दिला. प्रेयसीनं दिलेल्या नकारामुळे त्याला राग अनावर झाला. रोशनचं प्रेयसीसोबत कडाक्याचं भांडण झालं. यानंतर प्रेयसी हनुमान मंदिरात पुजा करीत होती. पुजा करीत असतानाच त्यानं प्रेयसीच्या गळ्यावर चाकू ठेवून वार केले.

Married Man Stabs Girlfriend in Nagpur
बीडमध्ये राजकीय भूकंप! मुंडेंचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी अजित दादांसोबत जाण्यामागचं सांगितलं कारण

चाकूनं वार केल्यामुळे रक्तबंबाळ झालेली तरूणी जमिनीवर कोसळली. गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीला तातडीनं रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, खापरखेडा पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com