
पराग ढोबळे, साम टीव्ही
नागपूर : भाजीपाला वाहनांच्या आडून छुप्या पद्धतीने ट्रकला कप्पा करून गांजाची तस्करीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. यात दोघांना गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून १०६ किलो २६ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. तर ट्रकसह एकूण ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ताज हबीब शेख मो. आणि शैलेंद्र राम लखन गुप्ता असे अटकेतील आरोपीच नाव आहे. पारडी हद्दीत ट्रकमधून ओडिशाहून नागपूरला भाजीपाल्याचा कॅरेटमध्ये खाली गांजा आणत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडारा-हैदराबाद हायवेवर सापळा रचला. त्यानंतर ट्रक येताच ट्रकला थांबवंलं. सुरवातीला भाजी विक्रीचे कॅरेट दिसून आले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर ट्रकला खास लोखंडी कप्पा असल्याचे आढळले. त्यात गांजा लपवल्याचं दिसून आलं. त्याला खास एक चावी सुद्धा होती.
पोलिसांना चौकशीत हा गांजा त्याने ओडिशाहून छोटू आणि वांगू नावाच्या दोन तस्करांकडून गांजा आणला होता. हा गांजा नागपुरातील यशोधरानगरमध्ये यशोधरानगरमध्ये मोहसीन उर्फ फिरोजला देणार असल्याचे सांगितले. पोलिस आता या तीन आरोपींचा शोध घेत आहे.
नागपुरात कुख्यात घरफोडी करणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी अटक केली. अफरोज शमशाद अन्सारी असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी घरफोड्या जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा घरफोडी आणि चोरीच्या करायला सुरुवात केली होती. पोलिसांनी वेळीच मुसक्या आवळल्यात. नंदनवन परिसरात झालेल्या घरफोडी मध्ये 8 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. त्याचा तपास पोलीस करत असताना हा आरोपी नंदनवन पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी आठपैकी चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.