Vidarbha Monsoon Alert : विदर्भाला आजही धो धो पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी, नागरिकांना सर्तकतेचा इशारा

Maharashtra Monsoon Alert 2025: विदर्भात रविवार पासून सुरू झालेल्या पावसामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
Nagpur Monsoon Alert
Nagpur Monsoon Alert Saam Tv
Published On

यंदा राज्यात पाऊस मे महिन्यात दाखल झाला असून जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाचा जोर कायम आहे. महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूर शहराला रविवारपासून पावसाने झोडपले. रविवारपासून सुरु झालेल्या या पावसाने सलग चौथ्या दिवशीही जोरदार बॅटिंग केली आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला आज सलग चौथ्या दिवशी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.सततच्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रविवारपासून सुरु झालेल्या पावसाने विदर्भाला झोडपून काढले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नागनदी, पोहरानदी, आणि पिवळी नदीला पूर आल्याने ५० हून अधिक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.शहरातील २३ प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने नदीचे स्वरूप आले होते. गेल्या २४ तासात नागपूर शहरात ९५.६ मिलिमीटर तर जिल्ह्यात १३९.६ मिलिमीटर पाऊस पडला.

Nagpur Monsoon Alert
Maharashtra Monsoon Tourism : धबधबा, धरणे, गडकिल्ल्यावर पर्यटनाला जाताय? थांबा...! सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

या मुसळधार पावसात ११ जनावरे मृत पावली असून ४५३ घराचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडचिरोली आणि नागपूर येथे २ हेलिकॉप्टरसह भारतीय सैन्य दल सज्ज झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

Nagpur Monsoon Alert
Monsoon Alert : विदर्भात जोरदार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा यलो अलर्ट

हवामान खात्याने आज पाचही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे.तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आहे.

Nagpur Monsoon Alert
Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

परिणामी, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी मुसळधार पावसाच्या शक्यतेने भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्राम्हपुरी तालुक्यातील शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील काही शाळांना गुरुपौर्णिमा निमित्त सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९० मार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com