धक्कादायक! कागदोपत्रीच शाळा… ४० शिक्षकांची फसवणूक, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Fake Minority Schools Scam In Nagpur Maharashtra: नागपूर आणि भंडाऱ्यात बनावट शाळांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ४० शिक्षकांची फसवणूक तर शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Investigation underway after fake schools in Bhandara duped teachers and put hundreds of students’ futures in jeopardy.
Investigation underway after fake schools in Bhandara duped teachers and put hundreds of students’ futures in jeopardy.Saam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर: शिक्षण क्षेत्रात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, भंडारा येथील 'छप्परबंद' नावाच्या संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा पूर्णपणे अवैध असल्याचे समोर आले आहे. या संस्थेने सरकारी अनुदानाचे आमिष दाखवून तब्बल ४० शिक्षकांकडून मोठी रक्कम उकळली असून शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्य धोक्यात आले आहे.

Investigation underway after fake schools in Bhandara duped teachers and put hundreds of students’ futures in jeopardy.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

भंडाऱ्यातील या संस्थेमार्फत 'झुबेदा' आणि 'गोसिया' नावाच्या दोन शाळा चालवल्या जात होत्या. या शाळांना ना शासनाची मान्यता होती, ना शिक्षण विभागाची अल्पसंख्याक दर्जा मिळवून सरकारी अनुदान मिळवून देतो असे सांगून संस्थेने ४० सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून पैसे उकळले. जेव्हा काही पीडित शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली. आयोगाचे ओएसडी मुश्ताक खान यांनी शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तिथे शाळेचे अस्तित्वच कागदोपत्री नसल्याचे आढळले.

Investigation underway after fake schools in Bhandara duped teachers and put hundreds of students’ futures in jeopardy.
Ashok Kharat: अशोक खरात खायचा शक्तिवर्धक गोळ्या, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड

चौकशीत धक्कादायक माहिती समोर

शाळेत पहिली ते नववीपर्यंतचे सुमारे १७२ ते ४५० विद्यार्थी शिकत होते.

या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टीसीसी (TC), गुणपत्रिका आणि इतर सर्व कागदपत्रे पूर्णपणे बोगस आहेत.

पालक आणि विद्यार्थ्यांना या फसवणुकीची पुसटशीही कल्पना नव्हती.

Investigation underway after fake schools in Bhandara duped teachers and put hundreds of students’ futures in jeopardy.
महाराजांच्या पुतळ्याला विरोध केल्यास लक्ष्मण हाकेंना कपडे फाटूस्तर मारू...; माढ्यातल्या राड्यावरुन पाटलांचा इशारा

अल्पसंख्याक आयोगाची आक्रमक भूमिका

अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, शिक्षण अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय इतका मोठा घोटाळा होऊच शकत नाही. जर आयोगाला हे समजू शकते, तर शिक्षण विभागाला कसे समजले नाही? याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात संबंधित शाळा चालक आणि शिक्षकांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात मुलांच्या आयुष्याशी असा खेळ होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com