

वाशीममध्ये महाविकास आघाडीला भाजपने मोठा धक्का दिला.
शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात दाखल झाले.
या अचानक घडलेल्या पक्षांतरामुळे नगरपरिषद निवडणुकीचे समीकरण बदलले आहे.
प्रवेश सोहळ्यात खासदार अनुप धोत्रे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होते.
मनोज जौस्वाल, वाशिम प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
MVA leaders defect to BJP in Maharashtra civic polls : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सुरू असतानाच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वाशीममध्ये माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपात जाहीर प्रवेश केला. नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडल्याचा फायदा भाजपला होणार आहे. स्थानिक पातळीवर भाजपची ताकद आणखी वाढली आहे. तर मविआ खिळखिळी झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे.
वाशीम नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे दोन दिवस उरले असताना भाजपने महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तब्बल १५ माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्षांचा भव्य पक्षप्रवेश करून घेतला आहे. या अचानक घडलेल्या राजकीय हालचालीमुळे शहरातील निवडणूक समीकरणच बदलले आहे. वाशिममध्ये भाजपाचे पारडे अधिक मजबूत झाल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात होत आहे.
वाशीमच्या विठ्ठलवाडी सभागृहात झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार अनुप धोत्रे, वाशिम निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे, भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे आणि आमदार श्याम खोडे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते मोठ्या संख्येने भाजपात दाखल झाले. या प्रवेश घेणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले, माजी नगरउपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकर वानखेडे, माजी नगरसेवक ॲड. विनोद खंडेलवाल, अतुल वाटाणे यांच्यासह डझनभर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.