Maharashtra politics : काँग्रेसला ठाकरे नकोत! बिहारमध्ये पराभव, महाराष्ट्रात सावधगिरी

impact of MNS entry on MVA alliance stability : बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसने ठाकरे गटापासून अंतर ठेवत मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या एण्ट्रीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढली असून काँग्रेसने मनसेसोबत युतीला स्पष्ट नकार दिला आहे.
Maharashtra Politics:
raj thackeray and uddhav thackerayX
Published On
Summary
  • मनसेच्या एण्ट्रीनंतर महाविकास आघाडीत तणाव वाढला

  • काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.

  • हिंदी सक्तीविरोधी भूमिकेमुळे ठाकरे–मनसे जवळ येत असताना काँग्रेसने दोघांपासून अंतर ठेवले.

  • बिहारमधील पराभव आणि परप्रांतिय मतदार दुरावण्याच्या भीतीमुळे काँग्रेसने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

why Congress decided to contest Mumbai BMC elections alone : मनसेच्या एण्ट्रीने महाविकास आघाडीत बिघाडी झालीय.. आधीच बिहारमध्ये धुळधाण उडाली असतानाही काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय.. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्येही महाआघाडीचं पानिपत झालं... काँग्रेसला तर दोन अंकी जागाही जिंकता आल्या नाहीत..त्यामुळे काँग्रेसवर टीकेची झोड उठलीय... त्याच दरम्यान काँग्रेसनं मात्र ठाकरेंची साथ सोडत मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय..

खरं तर हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले...तेव्हापासूनच काँग्रेसने ठाकरेपासून अंतर राखायला सुरुवात केली.. मात्र व्होटचोरीच्या मुद्द्यावर मनसेसह महाविकास आघाडीने एकत्र मोर्चा काढला.. त्यामुळे पुन्हा युतीच्या चर्चांनी जोर धरला... असं असताना काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात स्वबळाचा नारा दिलाय.. एवढंच नाही तर मनसेच्या खळ्ळखट्याक स्टाईलमुळेच मनसेसोबत युती करणार नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय.. तर ठाकरेंना सोडण्याचं वेगळंच कारण असल्याचा टोला ठाकरेसेनेनं लगावलाय..

Maharashtra Politics:
Thane to Bhiwandi : ठाणे ते भिवंडी, आता फक्त ७ मिनिटांचा प्रवास, ६ पदरी पूल होणार, वाचा MMRDA चा प्लॅन

दुसरीकडे मात्र अजूनही राज्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये आघाडीबाबत संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसतंय. ठाकरे बंधूंकडून आघाडीचा प्रस्ताव आला नसल्याचं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय

Maharashtra Politics:
Leopard : ऊसाच्या शेतातील बिबट्या घरात, पुणे-नगरसह ६ जिल्ह्यात दहशत

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आघाडीचा फायदा झाला... मात्र मुंबईचं गणित लक्षात घेता ठाकरेंमुळे परप्रांतिय मतदार दुरावण्याच्या भीतीमुळेच काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे.. मात्र स्वबळ अजमावणारी काँग्रेस मुंबई महापालिकेत आपला प्रभाव दाखवणार की घसरणीचा पाढा कायम ठेवणार? याचीच उत्सुकता आहे...

Maharashtra Politics:
Indurikar Maharaj : या औलादी माझ्या मुळावर उठणार, इंदुरीकर महाराजांचे चॅलेंज; म्हणाले, मुलीचे लग्न....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com