Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?
MVA seat sharing maharashtraMVA seat sharing maharashtra

Maharashtra Politics: काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

MVA Seat Sharing Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी मविआचे जागावाटप सुरु आहे. त्यामध्ये काँग्रेसने १२५ जागांवर दावा ठोकलाय.
Published on

Vidhansabha Election News: विधानसभा निवडणुकीआधीच मविआमध्ये जागावाटपचा तिढा निर्माण झालाय. ताज्या माहितीनुसार, काँग्रेसने विधानसभेसाठी तब्बल १२५ जागांची मागणी केली आहे. लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा विश्वास वाढला आहे. त्यामुळेच जास्त जागांची मागणी करण्यात येत आहे. काँग्रेसने विदर्भात सर्वाधिक जागांची मागणी केली आहे.

महाराष्ट्रातील सत्तासमीकरणात काँग्रेस सर्वात महत्वाची भूमिका बजावणार, हे निश्चित आहे. जनतेचा प्रतिसाद लक्षात घेता, काँग्रेसला किमान १२५ जागा मिळाव्यात, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने साम टिव्हीशी बोलताना सांगितले. काँग्रेसच्या या मागणीनंतर ठाकरे आणि पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय.

काँग्रेसने १२५ जागांवर दावा ठोकला, कोणत्या भागातील कोणत्या जागा हव्यात ?

विदर्भात ३८-४०

मराठवाडा २५-३०

उत्तर महाराष्ट्र २०

पश्चिम महाराष्ट्र २०

मुंबई १८

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या आहेत. पण फॉर्मुला अद्याप ठरलेला नाही. महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण? सर्वाधिक जागा कोण लढणार? यावर चर्चा सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कमी जागा लढवत मोठं यश मिळावले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जास्त जागांची मागणी केली आहे.

दोन टप्प्यात मतदान -

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण राजकीय नेत्यांनी अंदाज वर्तवलाय. त्यानुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते २० नोव्हेंबर यादरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होऊ शकतात. त्याशिवाय यावेळी राज्यातील निवडणुका दोन टप्प्यात होऊ शकतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com