Murbad BJP : मुरबाडमध्ये भाजपला धक्का; ९ नगरसेवक फुटले, वेगळा गट स्थापन करत नगरपंचायतीत सत्तांतर

Mumrbad news : मुरबाड नगरपंचायतीवर भाजपचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या निवडणुकीतही एकूण १७ नगरसेवकांपैकी भाजपच्या १० नगरसेवकांचा विजय झाला. तर शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आले
Mumrbad news
Mumrbad newsSaam tv
Published On

मयुरेश कडव
मुरबाड
: मुरबाड नगरपंचायतमध्ये उलटफेर झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. नगरपंचायतीवर भाजपची सत्ता होती. मात्र काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती. यामुळे भाजपच्या दहा पैकी ९ नगरसेवक फुटले असून या नगरसेवकांनी परीवर्तन पॅनल असा वेगळा गट स्थापन करत नगरपंचायतीमध्ये सत्तांतर घडवून आणले आहे. ९ नगरसेवक फुटल्यामुळे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार किसन कथोरे अनेक वर्षे आमदार आहेत. मुरबाड नगरपंचायतीवर भाजपचा वरचष्मा राहिला आहे. गेल्या निवडणुकीतही एकूण १७ नगरसेवकांपैकी भाजपच्या १० नगरसेवकांचा विजय झाला. तर शिवसेनेचे ५ उमेदवार निवडून आले. २ अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडून आले होते. मात्र दीड वर्षात मुरबाड पंचायत समितीची निवडणूक होणार आहे. भाजपातील फूट लक्षात घेता पुन्हा या ठिकाणी सत्ता काबीज करण्यासाठी भाजपला आणि पर्यायाने आमदार किसन कथोरे यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Mumrbad news
Dhule Crime : पूजा बागुल हत्या प्रकरण; धक्कादायक माहिती आली समोर, पतीने दिली होती मांत्रिकाला सुपारी

उपनगराध्यक्ष निवडीपासून भाजपात धुसपूस
दरम्यान काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपात धुसपूस असल्याचे समोर आले आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने भाजपच नगरसेवकांनी विरोध केल्याची चर्चा होती. त्याविरूद्ध नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीतही उपनगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवाराला भाजप नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाला.  

Mumrbad news
Ahilyanagar : हुंडा बंदीसाठी गावाची अनोखी बक्षीस योजना; सौंदाळा ग्रामसभेत आदर्श ठराव मंजूर

नाराजी व्यक्त करत आमदारांवर टीका  
मुरबाड नगरपंचायतीत भाजपचे १० नगरसेवक होते. यापैकी ९ नगरसेवकांनी आमदार किसन कथोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक करत परिवर्तन पॅनल हा वेगळा गट स्थापन केला आहे. तसेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत नाराज गटातील नगरसेवक राम दुधाळे यांनी आमदार किसन कथोरेवर टीका केली आहे. विकास कामांच्या बाबतीत आमदार दुजाभाव करतात. तसेच सदस्यांना सापत्नभावाची वागणूक देतात; असा आरोप या सदस्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com