नागपूरात ओमिक्रोनचा रुग्ण आढळल्यानं महापालिका प्रशासन अलर्टवर
नागपूरात ओमिक्रोनचा रुग्ण आढळल्यानं महापालिका प्रशासन अलर्टवरSaamTV

नागपूरात ओमिक्रोनचा रुग्ण आढळल्यानं महापालिका प्रशासन अलर्टवर

ओमिक्रोनबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू
Published on

नागपूर - नागपूरात ओमिक्रोनचा शिरकाव झाल्यावर महापालिका प्रशासन अलर्टमोड वर आहे. शहरात पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. ओमिक्रोन पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांना ट्रेस करून टेस्ट केल्या जात आहेत. या रुग्णाच्या घरातील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, विमानात आणि इतर ठिकाणी संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध महापालिका घेत आहे.

हे देखील पहा -

त्याशिवाय देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र भरुन देणं अनिवार्य करण्यात आलं आहे. प्रत्येक विमानप्रवाशाला 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सुदैवाने ओमिक्रोनबाधीत रुग्णाला कुठलेही लक्षणं नाही. मात्र, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्ध स्तरावर शोध घेतला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com