OBC Reservation: आता ओबीसी आंदोलनालाही परवानगी नाकारली, काय आहे कारण? कुठे होणार होतं आंदोलन? जाणून घ्या

OBC Reservation News: ओबीसी जनमोर्चाच्या वतीने दिनांक 26 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या धिक्कार आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
OBC Reservation
OBC ReservationSaam Digital
Published On

OBC Reservation

ओबीसी जनमोर्चाच्या वतीने दिनांक 26 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या धिक्कार आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ओबीसीनेते प्रकाश शेंडगे यांनी ही परवानगी मागितली होती.

आझाद मैदानावर आंदोलनासाठी ओबीसी आणि मराठा समाज आग्रही आहेत. दोन्ही समन्वयकांकडून मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडून परवानगी कोणाला मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र न्यायालयाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला सुनावलं होतं. त्यामुळे दोन्हीही आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मुंबईत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारणारी नोटीस जरांगे यांना पाठवली आहे. आज गुरुवारी मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ ठरली. मात्र, त्यानंतर मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषण करणार आहे. त्यासाठी त्यांची पदयात्रा जालन्याहून मुंबईकडे निघाली आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत मोठ्या संख्येने लोक पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना मुंबई न येण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

OBC Reservation
Sadavarte On Maratha Morcha: म्हणून मराठा बांधवांना आरक्षण मिळू शकत नाही, जरांगेंवर हल्लाबोल करत सदावर्तें म्हणाले...

आंदोलनामागे राजकीय षडयंत्र: गुणरत्न सदावर्ते

मराठा आंदोलनाच्या मागे सगळ्यात मोठा राजकीय डाव आहे.एका बाजूला स्वतः सांगायचं जायचं नाही आणि नंतर लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा. स्वतःला वाचवायचा आणि इतरांना तोफेच्या तोंडाला द्यायचं.सामान्य कुटुंबांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका.कायद्याचं पालन, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. आझाद मैदान, शिवाजी पार्कसाठी परवानगी नसल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. मात्र मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम आहेत.

OBC Reservation
CM Eknath Shinde: राज्यात शांतता नांदूदे..., उत्तेश्वराच्या दर्शनानंतर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com