Covid 19 Report Today : राज्याचा आजचा करोना रिपोर्ट आला, धडकी भरवणारी आकडेवारी; काळजी घ्या!

राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
corona cases
corona cases Saam Tv
Published On

Maharashtra Covid 19 Update : राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ६३ टक्क्यांनी वाढली आहे. (Latest Marathi News)

राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गुरुवारी ६८४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ३०१६ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात कोरोनामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू झाला नाही. राज्याचा मृत्यूदर १.८२ टक्के झाला आहे.

corona cases
Viral Video: पोलिसांनी चक्क कुत्र्याला घातलं हेल्मेट; नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक आणि सांगली या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे . आज दिवसभरात राज्यात १,१०,५२२ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

लोकांनी अधिक सतर्क राहावे

दरम्यान, देशात नवा कोरोना व्हेरियंटचे रुग्ण देखील आढळून येत आहेत. नवी दिल्लीतील एम्समधील क्रिटिकल केअर विभागाचे प्राध्यापक डॉ. युद्धवीर सिंह यांनी सांगितले की, कोविड १९ चे रुग्ण वाढण्यामागील कारण हा नवा व्हेरियंट असू शकतो. ज्या नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे ते बाधित होत आहेत.

corona cases
Indore Jhulelal Mandir Accident: इंदूर मंदिर दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्यू, मध्य प्रदेश सरकारकडून मदतीची घोषणा

लोक फ्लूची लक्षणे दिसून आल्यास रुग्णालयांत जात आहेत. तिथे त्यांची कोविड १९ चाचणीही केली जात आहे. चाचणीत करोना संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत आहे. करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अशात लोकांनी अधिक सतर्क राहायला हवे. नागरिकांनी मास्क लावावे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असा सल्लाही डॉ. सिंह यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com