Indore Jhulelal Mandir Accident: इंदूर मंदिर दुर्घटनेत 13 जणांचा बुडून मृत्यू, मध्य प्रदेश सरकारकडून मदतीची घोषणा

Indore Tragedy : रामनवमीनिमित्त मंदिरात पूजा सुरु असतानाच ही घटना घडाली आहे.
Indore News
Indore News Saam Tv
Published On

MP News : मध्य प्रदेश (Madhya Pradesh)  इंदूरमध्ये बेलेश्वर मंदिरातील विहिरीवरील छत पडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांना याबाबत माहिती दिली आहे. रामनवमीनिमित्त मंदिरात पूजा सुरु असतानाच ही घटना घडाली आहे.

इंदूरमधील या दु:खद घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदी यांनी म्हटलं की, इंदूरमधील घटनेमुळे मी खूप दु:खी आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी बोलून परिस्थिती जाणून घेतली आहे. राज्य सरकारचं बचाव आणि मदत कार्य वेगाने सुरु आहे. माझ्या सहवेदना सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. (Latest Marathi News)

Indore News
Kolhapur News : अंबाबाईचं दर्शन घेतलं अन् मंदिरातून बाहेर पडताच भाविकाचा मृत्यू; नातेवाईकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पदरी दु:खच आलं

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर जखमींना 50,000 हजाच्यां मदतीची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी रामनवमीनिमित्त मंदिरात भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळीही यज्ञ केला जात होता. यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मंदिरात लोक पूजा करत होते.

Indore News
Pune News : ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून पडल्याने MBBS विद्यार्थिनीचा मृत्यू, पोलिसांना वेगळाचा संशय

मंदिरात असलेल्या विहिरीवर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं आणि सुमारे 20 ते 25 जण विहिरीत पडले. विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com