Pune News : ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून पडल्याने MBBS विद्यार्थिनीचा मृत्यू, पोलिसांना वेगळाचा संशय

Pune News : बंडगार्डन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
MBBS Student
MBBS StudentSaam TV

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. ससूनच्या इमारतीवरून पडल्याने 20 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यान एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी ही घटना घडली आहे. उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. (Pune News)

अदिती दलभंजन असं मृत तरुणीचं नाव आहे. अदिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. (Latest Marathi News)

MBBS Student
Pune News : पैशांपुढे मैत्री हरली! कट रचून डोक्यात हातोडा घालत मित्राला संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अदिती ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या छतावर गेली. तेथून खाली पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. अदितीला तातडीने उपचारासाठी आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते.

MBBS Student
Uddhav Thackeray News : शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला, पण श्रीराम माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं

सर्व स्पेशालिटी डॉक्टरकडून तिचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र तिने नैराश्येतून तसेच अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com