Viral Video: पोलिसांनी चक्क कुत्र्याला घातलं हेल्मेट; नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

Pune Latest News : पुणेकरांनी हेल्मेट घालावे यासाठी कुत्र्याला हेल्मेट घालून अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे.
pune Viral Video
pune Viral VideoSaam tv
Published On

Pune Viral Video News : राज्यात दिवसेंदिवस रस्त्यांवर होण्याऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात घडणाऱ्या विविध अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे दुचाकीवरून जाताना हेल्मेटमुळे अनेकांचे प्राण देखील वाचले आहेत. यामुळे पुणेकरांनी हेल्मेट घालावे यासाठी कुत्र्याला हेल्मेट घालून अनोख्या पद्धतीने जनजागृती केली आहे. (Latest Marathi News)

पुण्यात (Pune) बहुतांश दुचाकीस्वारांचा हेल्मेट न घालण्याकडे कल दिसून येतो. त्यामुळे जिल्ह्यात दुचाकीस्वारांचे अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हेल्मेट घालण्याच्या सूचना वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जातात.

मात्र, तरीही काही दुचाकीस्वार हेल्मेट न घालता बाहेर रस्त्यावर दुचाकी चालवताना दिसतात. त्यामुळे प्रशासनाकडून वेळोवेळी पुणेकरांचे प्रबोधन केले जाते. तरीही पुणेकरांनी हेल्मेट न घालण्याच्या चुका घडतात. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांकडून (Police) हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई देखील केली जाते.

pune Viral Video
Ram Navami 2023: काळा पोशाख, डोक्यावर भगवा अन् 'जय श्री राम'चा नारा! खासदार नवनीत राणांची डॅशिंग बुलेट राईड; VIDEO तुफान VIRAL

पुण्यात रस्त्यावरून दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या लाखोंच्या पार गेली आहे. शहरात दुचाकीमुळे होणाऱ्या अपघातात देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुचाकीस्वारांच्या अपघातात बहुतांश जणांच्या मेंदूला गंभीर इजा होते. त्यामुळे हेल्मेट घालणे आवश्यक अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

रस्त्यावरील दुचाकीस्वारांची अपघात कमी होण्यासाठी आणि दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी चक्क कुत्र्याला घालून गाडीवर फिरवलं आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस नाईक आतिश खराडे यांनी दुचाकीस्वारांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घालावे, यासाठी पाळीव कुत्र्याला हेल्मेट घालून जनजागृती सुरू केली आहे. त्यांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या अनोख्या आयडियाचा वापरत करत वाहतूक विभागाचे पोलीस नाईक आतिश खराडे यांनी पुन्हा एकदा हेल्मेट आवाहन सर्वांना केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com