Ram Navami 2023: काळा पोशाख, डोक्यावर भगवा अन् 'जय श्री राम'चा नारा! खासदार नवनीत राणांची डॅशिंग बुलेट राईड; VIDEO तुफान VIRAL

Navneet Rana Bullet Ride Viral Video: ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर... म्हणत नवनीत राणा यांच्या या हटके स्टाईलमध्ये बुलेट राईडचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे...
Navneet Rana Viral Video
Navneet Rana Viral VideoSaamtv
Published On

>>अमर गटारे...

Navneet Rana Viral Video: देशभरात आज रामनवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळत आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या धुम धडाक्यात देशभरात साजरा होत आहे. याच निमित्ताने राजकीय नेत्यांनीही सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत रामनवमीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. याच निमित्ताने खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामधील नवणीत राणांच्या हटके स्टाईलने अन् बुलेटस्वारीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Latest Marathi News)

Navneet Rana Viral Video
Ajit Pawar News: सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक म्हणणे महाराष्ट्राचा अपमान नाही का? अजित पवारांचे शिंदे- फडणवीस सरकारवर टीकास्त्र

याबाबत अधिक माहिती अशी की, आज रामनवमी (Ramnavami) निमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी डोक्याला भगवा गमछा तथा उपरणं बांधलंय. काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केली. ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला सुरुवात केली.

त्यांच्या या हटके शुभेच्छांचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांच्या या हटके स्टाईलचे कार्यकर्त्यांकडूनही जोरदार कौतुक होताना दिसत आहे.

Navneet Rana Viral Video
Nana Patole: दोन धर्म, जातीत फूट पाडून इंग्रजांप्रमाणे भाजप पुढे जातेय; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रमांचे आयोजन...

अमरावतीत येत्या काही दिवसात १११ फुट उंचीची भव्य हनुमान मूर्ती विराजित केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम या दिवशी केला जाईल. यावेळी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामार्फत सामुहिक हनुमान चालिसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांना टार्गेट करण्यासाठी नवनीत राणा यांनी केलेल्या हनुमान चालिसा पठनासाठी केलेलं आंदोलन, याविरोधात त्यांच्याविरोधात दाखल झालेला देशद्रोहाचा गुन्हा आणि १४ दिवसांचा तुरुंगवास या सर्व घटनाक्रमाचे फोटो असलेले भव्य बॅनर अमरावती तसेच मुंबईतही झळकवण्यात आले आहेत. या बॅनरवर त्यांचा हिंदू शेरणी असा उल्लेखही केला आहे.. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com