Metro Train : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! पैशांची होणार बचत, मेट्रो ट्रेन मार्फत मोठी घोषणा

आजपासून पदवी, पदविका, आयआयटी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येत आहे.
Mumbai Metro
Mumbai Metro Saam TV
Published On: 

Metro Train For Student's : विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे. पदविधर विद्यार्थ्यांनाही मेट्रो प्रवासात सवलत मिळणार आहे. विद्यार्थ्यांना तिकीटांच्या दरात तब्बल ३० टक्के सवलत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही सेवा १३ फ्रेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलीये. (Latest Metro Train News)

आजपासून पदवी, पदविका, आयआयटी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येत आहे. पदविधर विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत मिळाल्याने रोज हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. यापूर्वी मेट्रोने १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सवलत दिली होती.

Mumbai Metro
Vande Bharat Train: मुंंबई-पुणे मार्गावरील इतर ट्रेनच्या तुलनेत वंदे भारतचे प्रवास भाडे महाग, जाणून घ्या किती?

७ फ्रेब्रुवारीपासून १२वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात सवलत सुरू करण्यात आली. यामुळे अनेक विद्यार्थी मेट्रो प्रवासाच्या दिशेने वळाले. ही सवलत आता पदवी, पदविका, आयआयटी आणि पॉलिटेक्निक यांसह इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात आली आहे.

Mumbai Metro
Nagpur Metro Ticket Price: नागपूर मेट्रोत ५ रुपयांत करता येणार प्रवास; चेक करा तिकीटांचे दर

सवलत मिळवण्यासाठी लागतात ही कागदपत्रे

साध्या लोकल ट्रेनने प्रवास करताना विद्यार्थ्यांना कॉलेजमधून एक फॉर्म तिकीट खिडकीवर जमा करावा लागतो. त्याचप्रमाणे आता मेट्रोसाठी मेट्रोस्टेशनच्या तिकीट खिडकीवर कॉलेजचं (Collage) आयडी कार्ड, बोनाफाईट देणे गरजेचे आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना तिकीटाच्या दरात सवलत दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com