Jogeshwari Accident News: जोगेश्वरीत मोठी दुर्घटना! शाळेतील इमारतीचा काही भाग कोसळला; विद्यार्थ्यांमध्ये घबराट

Jogeshwari School Building Part Collapsed: सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Jogeshwari Accident News
Jogeshwari Accident NewsSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai Accident News: मुंबई उपनगरातील अंधेरी पूर्व चकाला रामबाग सोसायटीत दरड कोसळल्याची दुर्घटना ताजी असतानाच आता जोगेश्वरी (Jogeshwari) पूर्वेतील एका शाळेत इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडलीये. (Latest Jogeshwari News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मेघवाडी पीपल्स वेल्फेअर इंग्लिश हायस्कूलमध्ये लॅबची गॅलरी कोसळी आहे. सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

Jogeshwari Accident News
Bhandara Accident News: बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; भंडाऱ्यातील सहकार नगर येथील घटना

घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस घटनास्थळावर दाखल झालेत. सध्या येथील विटा आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

लॅबचा मोठा भाग कोसळल्याने नुकसान झाले आहे. शाळेमध्ये (School) लॅबची गॅलरी कोसळल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jogeshwari Accident News
Viral Accident Video: भयंकर व्हिडिओ! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोघांच्या अंगावरून गेली भरधाव कार; पुढे जे घडलं ते...

अंधेरी पूर्वेतील चकाला परिसरात दरड कोसळली

मुंबईतील अंधेरी पूर्वेतील (Andheri Landslide) चकाला परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास बाजूला असलेल्या डोंगरामधून काही भाग रामबाग सोसायटीतील चाळीवर कोसळला. घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली.

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक ११४ इमारती पश्चिम उपनगरातील आहेत. शहर भागातील ३६ आणि पूर्व उपनगरातील ६६ इमारतींचा यामध्ये समावेश होता. या सर्व इमारती अतिधोकादायक आहेत. त्यातील ९७ इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान सध्या पालिकेसमोर उभे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com