Bhandara Accident News
Bhandara Accident NewsSaam Tv

Bhandara Accident News: बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी; भंडाऱ्यातील सहकार नगर येथील घटना

भंडाऱ्यात बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
Published on

शुभम देशमुख

Bhandara Accident News: भंडाऱ्यात बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही बस प्रवासी घेऊन भंडारा-तुमसर मार्गे तिरोडा येथे जात होती. यावेळी अचानक या बसने एका दुचाकीस्वाराला समोरसामोर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सहकारनगर - शास्त्री चौक येथे घडली. प्रेमलाल बडवाईक (५५) रा. गंगानगर (खोकरला) असे जखमीचे नाव आहे. (Latest Marathi News)

Bhandara Accident News
Pune Crime News: पत्नी आणि पुतण्याची हत्या करत सहाय्यक पोलीस आयुक्ताने संपवलं जीवन; पुण्यातील खळबळजनक घटना

संपूर्ण प्रकरण काय?

तिरोडा आगाराची एसटी बस (Bus) ही प्रवाशी घेऊन भंडारा- तुमसर मार्गे तिरोडा येथे भंडारा बसस्थानकावरुन निघाली. सहकारनगर ते शास्त्री चौक या दरम्यान प्रेमलाल हे आपल्या दुचाकीने घराकडे जात होते. या अचानक बसने दुचाकीला जबर धडक दिली.

यात प्रेमलाल दुरवर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाला आहेत. अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमी प्रेमलाल यांना उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. (Accident News)

Bhandara Accident News
Kolhapur Panchganga River: कोल्हापूरकरांसाठी धोक्याची घंटा! पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; प्रशासन अलर्ट मोडवर

मात्र या अपघातात मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती भंडारा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोयर करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com