Bomb Threat : हावडा मुंबई एक्स्प्रेसमध्ये टायमर बॉम्ब, नाशिकआधी मोठा स्फोट; रेल्वेला धमकीचा मेसेज

Mumbai-Howrah Mail gets bomb threat : मुंबईकडे जाणाऱ्या 12809 हावडा - मुंबई मेल या रेल्वे गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला असल्याच्या धमकीचा रेल्वे विभागाला ट्विटर वरून मेसेज
Mumbai-Howrah Mail gets bomb threat
Mumbai-Howrah Mail gets bomb threatMumbai-Howrah Mail gets bomb threat
Published On

Howrah–Mumbai Mail : हावडा वरून येणारी मुंबई हावडा एक्सप्रेस ट्रेन या गाडीत टायमर बॉम्ब असून नाशिक स्थान येण्यापूर्वी उडवण्याची धमकी ट्विटर वरून धमकी रेल्वे पोलिसांना मिळतात जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस तसेच जळगाव पोलीस दल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव स्थानकावर मुंबई हावडा गाडीची दोन तास तपासणी केली. तपासणी कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली.

मुंबई-हावडा मेल एक्स्प्रेसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ऑफ कंट्रोल ऑफिसला धमकीचा मेसेज आला होता. मेसेज नंतर जळगाव स्थानकावर ट्रेन थांबवून करण्यात आली तपासणी करण्यात आली. ट्रेनमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही, त्यामुळे तपासणीनंतर ट्रेन पुढे मार्गस्थ करण्यात आली.

नाशिकच्या आधी स्फोट, धमकीचा मेल

मुंबई हावरा मेलमध्ये बॉम्ब असल्याची ट्विटरवरून धमकी देण्यात आली होती. मुंबईकडे जाणाऱ्या 12809 हावडा - मुंबई मेल या रेल्वे गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे, अशी धमकी रेल्वे विभागाला ट्वीटवर देण्यात आली. मुंबई हावडा मेल गाडीत नाशिकच्या आधी मोठा बॉम्बस्फोट करण्याची धमकी यामध्ये देण्यात आली.

धमकीनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. पहाटे 4:17 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर 12809 हावडा - मुंबई मेल ही गाडी थांबवून रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्बाची तपासणी करण्यात आली.

Mumbai-Howrah Mail gets bomb threat
Air India Bomb Threat: खळबळजनक! एअर इंडियाचे विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई-न्यूयॉर्क फ्लाईट दिल्लीकडे वळवली

पूर्ण रेल्वे गाडीच्या तपासणीनंतर 6 वाजून 28 मिनिटांनी रेल्वे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली. Fazluddin Nirban या नावाच्या ट्विटर अकाउंट वरून रेल्वेत विभागाला धमकीचा मेसेज आला होता. याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु कऱण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com