Ladki Bahin Yojana: सरकार नववर्षात लाडक्या बहिणींना देणार New Year Gift; योजनेचे पैसे जानेवारीत मिळण्याची शक्यता

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गतचे डिसेंबरचे पैसे जानेवारी महिन्यामध्ये मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Mukhyamantri Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

Ladki Bahin Yojana: राज्यातील गरजू, गरीब महिनांसाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु केली. या योजनेच्या अंतर्गतची नोव्हेंबर २०२४ पर्यंतची रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर डिसेंबर महिन्याची रक्कम पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अवघ्या काही दिवसांत डिसेंबर संपणार आहे. अजूनही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत.

महायुती सरकारद्वारे काही महिन्यांपूर्वी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेची सुरुवात केली. महिलांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने शासनाने ही योजना जाहीर केली. योजनेच्या अंतर्गत काही निकष ठेवण्यात आले. या निकषांसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याचे सरकारने आश्वासन दिले. दिलेला शब्द सरकारने पाळला आणि दिवाळीपूर्वीच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै ते नोव्हेंबर असे साडेसात हजार रुपये पाठवले.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण आता सावत्र झाली का? प्रणिती शिंदेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. आचारसंहिता लागल्याने लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोबरची मुदत दिली. आचारसंहिता संपल्यावर लगेच सरकारने अर्ज पाहायला सुरुवात केली. ज्या अर्जांमध्ये त्रुटी, चुका होत्या ते परत पाठवण्यात आले. तर निवडलेल्या अर्जदार महिलांचे आधार कार्ड त्यांच्या खात्याशी जोडले.

निवडणुकीच्या काळात महायुतीने "लाडकी बहीण योजनेचे पैसे १,५०० रुपयांवरुन २,१०० रुपये करु", असा शब्द दिला होता. मुख्यमंत्र्यांनी 'हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबर महिन्याची रक्कम दिली जाईल' असेही म्हटले होते. महिना संपायला साधारण आठवडा शिल्लक आहे. अजूनही खात्यात पैसे न आल्याने राज्यातील गरजू महिला चिंतेत आहेत. तेव्हा वर्षांच्या शेवटच्या महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे बहिणीचे लक्ष लागले आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Rojgar Mela 2024 : अरे व्वा! एकाच दिवशी ७१ हजार जणांना अपॉइंटमेंट लेटर; एक-दीड वर्षात १० लाख तरुणांना नोकरी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला साधारणपणे १५ दिवस लागलात. त्यात हिवाळी अधिवेशन संपल्यावर पैसे येतील असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याने नववर्षात बहिणींना गिफ्ट मिळणार असा तर्क लावला जात आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडींच्या ताईंकडे सरकारचं दुर्लक्ष, तळमळीने काम करूनही मानधन रखडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com