Rojgar Mela 2024 : अरे व्वा! एकाच दिवशी ७१ हजार जणांना अपॉइंटमेंट लेटर; एक-दीड वर्षात १० लाख तरुणांना नोकरी

Rojgar Mela News: देशभरात ४५ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात तब्बल ७१००० पेक्षा जास्त तरुणांना नोकरीसाठी अपॉइंटमेंट लेटर मिळाले आहे.
Rojgar Mela 2024
Rojgar Mela 2024Saam Tv
Published On

देशभरात अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. देशभरातील तरुणांच्या नोकरीसाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असतात. वेगवेगळ्या योजनाअंतर्गत तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करुन दिली जाते. सरकारने तरुणांसाठी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला होता. देशातील ४५ ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. (Rojgar Mela)

Rojgar Mela 2024
BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; ६९० रिक्त जागा; पात्रता काय? अशा प्रकारे करा अर्ज

या रोजगार मेळाव्यात तब्बल ७१ हजारपेक्षा जास्त तरुणांना सरकारी नोकरीसाठी अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकांना संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मागच्या १ ते दीड वर्षात जवळपास १० लाख तरुणांना सरकारी नोकरी दिली आहे. आम्ही काही तरुणांना सरकारी व्यवस्थेचा भाग बनवत आहोत. देशात एकही तरुण बेरोजगार नसावा, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. (Rojgar Mela 2024)

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आपल्या देशातील तरुण पिढी ही आत्मविश्वासाने भरलेलेी असावा. भारतात सर्वाधिक स्टार्टअप आहेत. भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक स्टार्टअप सुरु करणारा देश आहे. तरुणांना प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी सरकार कार्यरत असते. यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना राबवली आहे. यामध्ये बँक सखी, एलआयसी विमा सखी योजना राबवली आहे.

Rojgar Mela 2024
ONGC Job: ONGC मध्ये नोकरी अन् ६६००० रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी मिळवून देण्याचे आम्ही नेहमीच काम करतो. मागील दहा वर्षात विविध मंत्रालय, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकरी देण्यासाठी मोहिम राबवली जाते.आजदेखील ७१,००० पेक्षा जास्त तरुणांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले आहे. देशातील ४५ वेगवेगळ्या ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित केला होता. या रोजगार मेळाव्याची सुरुवात २२ ऑक्टोबर २०२२ रोजी झाली होती. आतापर्यंत लाखो तरुणांना या रोजगार मेळाव्यात नोकरी मिळवून दिली आहे.

Rojgar Mela 2024
Bank Jobs: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; पात्रता पदवीधर; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com