
लाडकी बहीण आता सावत्र झाली का? हा चुनावी जुमला होता, हेच आता समोर आलं. सोलापूरला मंत्रीपद मिळालं नाही, ही शोकांतिका आहे. भाजपचं इथलं नेतृत्व सक्षम काम करत नाही. म्हणून कदाचित सोलापूरला मंत्रिपद मिळालं नसावं. पण लक्षात ठेवा मी सोलापूरची खासदार आहे. नोटबंदी सारखे निर्णय हे असंविधानिक होते. भाजपच्या काळात अघोषित आणीबाणी आहे अशी भाजपावर प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे. यावर भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.
लाडकी बहीण सावत्र नाही तर जिवाची झाली असून डिसेंबर अखेर नावे पैसे पडणार .खासदार प्रणिती शिंदे केवळ प्रसिध्दी झोतात राहण्यासाठी त्यांचा राजकिय खटाटोप चालू असतो. महायुती सरकारने दिलेले वचन पुर्ण करणार असून ज्या लाडक्या बहिणीला पैसे देवू नका म्हणुन प्रणितीताईचा पक्ष कोर्टात गेला त्या काँग्रेस वाल्यांना लाडक्या बहिणीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे प्रणिती शिंदेच्या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर केलं आहे.
अमित शाह यांचा राज्यसभेतील बाबासाहेबांचा व्हिडीओ दाखवून पत्रकार परिषदेला सुरुवात झाली. आम्हाला स्वर्ग नको, राष्ट्रीय आराध्य देवतेचे नावं भाजप वाले फॅशन म्हणून घेतात. बाबासाहेब यांनी स्वाभिमान मिळवून दिला आहे, त्या सर्वांना स्वर्ग नको आहे. मी सर्वांना मनापासून जयभीम करते, अमित शाह यांचा निषेधार्थ आम्ही करतो. संसदेत देखील आम्ही निषेध व्यक्त केला आहे. हा निषेध केवळ भाजप विरोध काँग्रेस नाही राहिला. बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांची लढाई आहे.
घरोघरी, गल्लीगल्ली ही लढाई सुरु राहिल. अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे ही आमची भूमिका आहे. खर्गे साहेब, राहुल गांधी आणि इंडिया आघाडी या घटनेचा निषेध करतेय. संविधानवर चर्चा आम्हाला आणखी हवी होती पण भाजपने होऊ दिली नाही. वैयक्तिक टीका आणि आरोप करण्यात यांनी वेळ घालवला . यांना संविधान मान्य नाही ते केवळ मनुस्पृती मानतात. संघाने कायम तिरंगाचा संविधानाचा अपमान केला आहे. अचानक त्यांच्या मनात आता संविधान आणि तिरंगाबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे.
संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे पार पाहिजे होतं. पण या देशाचे जनतेने ते होऊ दिलं नाही. जनतेने हे चालू दिलं नाही म्हणून त्यांच्या मनात अचानक प्रेम निर्माण झालं. अमित शाह यांचा खरा चेहरा संसदेत समोर आलं. संविधान बदलण्याचे कट कारस्थान यांचे नेहमी सुरु आहेत. अमित शाह जे बोलले ते केवळ एक संदर्भ नाही असे अनेक गोष्टी ते करतायत. पण जोपर्यंत इंडिया आघाडी आहे तो पर्यंत हे होऊ देणार नाही असं प्रणिती शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
प्रत्येक वेळी असं घडलं की हे विषयांतर करू पाहतात. उद्या आम्ही सोलापुरात एक मोर्चा काढणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यलयापर्यंत हा मोर्चा जाईल. अमित शाह जे बोलले ते रेकॉर्डवर आहे, आम्ही अरकाईव्ह मधून तो व्हिडीओ मागतोय ते देत नाहीयेत. भाजपला मोर्फ करण्याची सवय आहे त्यामुळेच ते उलट आमच्यावर असले आरोप करतात. (व्हिडीओ कट केल्याचा आरोपवर) संघाच्या लोकांनी म्हटलेलं संविधान कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासारखं आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
तीन रंग तिरंगायत असल्याने अशुभ असल्याचे म्हणले होते. आता अचानक यांना तिरंगा आणि संविधान बाबतीत प्रेम निर्माण झालेलं आहे. परभणीमध्ये जे घडले त्या सूर्यवंशी यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. उद्या राहुल गांधी परभणीला येणार आहेत. भाजप सत्तेत आल्यानंतरच अशा गोष्टी घडयाला सुरुवात होतात. Evm ची लढाई देखील अशीच आहे. ती भाजप विरुद्ध काँग्रेस राहिली नाही, लोकांची लढाई झाली आहे. मुख्यमंत्री हे ईव्हिएमचे मुख्यमंत्री आहेत. टेंडरसाठी मंत्री मंडळाचे खाते वाटप झाले आहे. राहुल गांधी मारकडवाडीला येतील पण तारीख अजून निश्चित नाही. नाना पाटोले यांनी जे राजीनामा देण्याचं बोलले ते नैतिक जबाबदारी स्वीकारून बोलले असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.