

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्तन आचारसंहिता लागू
गणवेशात रील्स, शॉर्ट्स, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि प्रतिमा मलिन करणारे व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई
राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्याने वर्तन आचारसंहिता लागू केलीय. त्यानुसार एसटीची प्रतिमा मलिन करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा असा इशारा एसटी महामंडळाने दिलाय. जे कर्मचारी नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,असं महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या नव्या नियमांचे एसटीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केलंय. (Msrtc Bans Reels, Shorts & Live Streaming In Uniform; New Code Of Conduct For St Employees)
एसटी महामंडळात कार्यरत असलेल्या चालक, वाहक आणि सर्व कर्मचाऱ्यांसाठी काही नवे सोशल मीडियाचे नियम लागू करण्यात आलेत. कर्तव्यावर असताना रील्स, व्हिडिओ बनवण्यास एसटी महामंडळाने कडक बंदी आणलीय. वाहन चालवताना रील्स, शॉर्ट्स, लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यास सक्त मनाई असणार आहे.
आगार, बसस्थानक, कार्यालय आणि एसटी बसमध्ये गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी असणार आहे. महामंडळाची गोपनीय माहिती, फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करायचे नाहीये. एसटी महामंडळाची गोपनीय माहिती, फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाही. सकारात्मक व्हिडिओंसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी बंधनकारक असणार आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. तसेच शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येईल, असे महामंडळाने स्पष्ट केलंय. दुसरीकडे प्रवासी सुविधा, स्वच्छता आणि रस्ता सुरक्षा प्रचारासाठी इन्फ्लुएन्सर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल.
सोशल मीडियावर सक्रीय असलेले कर्मचारी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून महामंडळाच्या अधिकृत माहितीचा, विविध प्रवासी सुविधा, लोककल्याणकारी योजना, अभिनव उपक्रम स्वच्छता व रस्ते सुरक्षा अभियान यांचा प्रसार करू शकतील. तसेच महामंडळातील इन्फ्यून्सर यांचा उपरोक्त अटी-शर्तीच्या आधारे प्रसार व प्रचार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. यासाठी आवश्यकतेनुसार विभाग स्तरावर संवाद बैठक आयोजित करून त्यांना महामंडळाच्या विविध योजना, उपक्रम व जनहिताच्या मोहिमांची माहिती वेळोवेही उपलब्ध करून द्यावी असं सांगण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.