

नांदेड : महावितरणचे कर्मचारी कर्तव्यावर असताना मारहाण होण्याच्या दोन घटना गोजेगाव व सगरोळी याठिकाणी घडल्या आहेत. थकबाकी वसुल करने सोबतच वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टीने काम करत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजग्राहकांकडून मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वरचेवर वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. मागील एक महिन्याच्या कालावधीतील नांदेड परिमंडळातील ही पाचवी घटना आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे.
मुक्रमाबाद शाखे अंतर्गत येणाऱ्या गोजेगाव येथे गुरुवार ( ता. एक ) रोजी श्याम जाधव या वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केलेला वीजपुरवठा चालू असल्याचे लक्षात येताच चौकशी केली असता श्याम जाधव व त्यांच्या घरातील दोन महिलांनी वरिष्ठ तंत्रज्ञ उद्धव सुदाम काळे यांना जबर मारहाण केली. याप्रकरणी मारहाण करणारे श्यामराव उमलाजी जाधव, शारदा श्यामराव जाधव तसेच शोभाबाई शंकर राठोड यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 342 आणि 34 अन्वये मुक्रामाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - ओला चालकाची भाड्याच्या वादातून लोणावळ्यात हत्या
दुसऱ्या घटनेत सगरोळी येथील केशवनगरमधील रोहीत्र ता. ३० जून रोजी नादुरुस्त झाल्याने या रोहीत्रावरील वीजपुरवठा दुसऱ्या रोहीत्रावर घेत असताना हणमंत मलशेटवाड या वीजग्राहकाने दुसऱ्या डिपीवर कनेक्शन देवू नको म्हणत महावितरणचे जनमित्र बाजीराव सायन्ना अंकुलवार आणि सोबतचे कंत्राटी मदतनीस गौतम देवराव वाघमारे यांना बेदम मारहाण केली. झाल्या प्रकाराबाबत बिलोली पोलिस ठाण्यात हणमंत मलशेटवाड याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण करत धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.