राज्यात स्पर्धा परीक्षेतल्या गैरव्यवहारांवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC विरोधातील रोष वाढत चाललाय. राज्यात सर्वत्र MPSC च्या कारभारावरा विरोधात आंदोलनं सुरू असताना संभाजी ब्रिगेडनंही या वादात उडी घेतली. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थेट नवी मुंबईतल्या MPSC कार्यालयात घुसले आणि त्यांनी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीनं एमपीएससी विरोधातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एव्हंढच नव्हे तर आयोगाच्या अध्यक्षांनाही काळं फासणार असल्याचा धमकी वजा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय.
तर दुसरीकडे, MPSC पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी शरद पवार गटानं पेपरफुटीत तब्बल 40 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केलाय. एव्हंढच नव्हे तर MPSC अध्यक्षांनी तातडीने राजीनामा दिला नाही तर तीव्र आंदोलनासाठी विद्यार्थी मुंबईत धडकतील, असा थेट इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय. तर विरोधक विद्यार्थ्यांच्या आडून राजकीय पोळी भाजत असल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय.
पुणे, कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांत MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात ऐतिहासिक मारबत मिरवणुकीत MPSC परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य करणाऱ्या बडग्याने विशेष लक्ष वेधून घेतलंय. आयोगाच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी उपरोधिक बडगा तयार करण्यात आलाय.
खरंतर, नीट पेपरफुटीनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यात आता महाराष्ट्रात घटनात्मक संस्थेच्या कारभारावर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर पेपरफुटीप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिलेत.
नवी मुंबईतील या घटनेनंतर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. आधीच सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेही MPSC विरोधात मैदानात उतरलेत. त्यामुळे आता MPSC अध्यक्ष, सचिवांच्या राजीनाम्यासाठी राज्यात नवं जंतरमंतर उभं राहतं का?... याकडे सर्वांचंं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.