MPSC Exam 2024 : ऐकावे ते नवल! 'तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते ..' एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील प्रश्नाने विद्यार्थी चक्रावले

Maharashtra Public Service Commission : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 नुकतीच पार पडली आहे. या परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे सध्या लोकसेवा आयोगाला चांगलच ट्रॉल केलं जात आहे.
MPSC Exam
MPSC ExamMPSC Site
Published On

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी (दि.01) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ (MPSC) राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. साधारणत: वर्षभराने ही परीक्षा पार पडली. या ना त्या कारणाने चर्चेत असणारी ही परीक्षा यावेळी त्यात विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

रविवारी झालेल्या या एमपीएससीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क मद्यपानावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळच्या परीक्षेत अनेक असे प्रश्न विचारण्यात आले होते. ज्यांनी विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडले. मात्र मद्यपानावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाने विद्यार्थी चांगलेच चक्रवलेले बघायला मिळाले.

MPSC Exam
Nagpur News : नागपुरात विचित्र अपघात, सहा गाड्या एकमेकांना धडकल्या!

एमपीएससीच्या परीक्षेसाठी दोन पेपर उमेदवारांना सोडवावे लागतात. पेपर दोन हा कलचाचणीचा पेपर असतो, त्यात काम करताना उमेदवार काय विचार करून निर्णय घेतो हे तपासलं जातं. त्याच पेपरमध्ये मद्यपानावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे भावी अधिकाऱ्यांनी नेमका काय आणि कसला विचार करणे अपेक्षित आहे, त्यांची विचारक्षमता नक्की कशी हवी आहे, त्यां असे प्रश्न अनेकांना पडत आहे.

MPSC Exam
Raigad Crime : अनैतिक संबंधातून निवृत्त बँक कर्मचाऱ्याची हत्या, महिलेने जेवणात विष कालवून संपवलं

एमपीएससीने दोन्ही पेपरमध्ये विचारलेल्या विविध प्रश्नांपैकी एक प्रश्न दारू पिण्याविषयी विचारण्यात आला. यासाठीविद्यार्थ्यांना चार पर्याय देखील देण्यात आले होते. यानंतर समाज माध्यमातून उलटसूलट चर्चांना उधाण आलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाला आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना यावरून सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे.

MPSC Exam
Sambhajinagar News : गॅस कटरने एटीएम फोडून ९ लाख लंपास; संभाजीनगर शहरातील रात्रीची घटना

काय आहे हा प्रश्न आणि त्याचे पर्याय

प्रश्न क्रमांक 80

तुमच्या मित्रांना दारू पिणे आवडते आणि तुम्हाला ते मद्यपान करण्यास प्रभावित करत आहेत. जर तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे नसेल आणि त्यांच्या अल्कोहोल सेवन करण्याच्या सवयीपासून स्वतःला बाहेर ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?

या प्रश्नासाठी काय पर्याय दिले होते..

1) मी माझ्या मित्रांना सांगेन की माझ्या पालकांनी मला दारू पिण्यास मनाई केली आहे

2) दारू पिण्यास नकार देईन

3) फक्त तुमचे मित्र मद्यपान करतात म्हणून मद्यपान करेन

4) नकार देईन आणि त्यांना खोटे सांगेन की तुम्हाला यकृताचा आजार आहे.

MPSC Question
MPSC QuestionSaamTv

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com