Nagpur News : नागपुरात विचित्र अपघात, सहा गाड्या एकमेकांना धडकल्या!

Nagpur Accident News : नागपूर येथे एक विचित्र अपघात झाला असून यात 6 गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Nagpur Accident News
Nagpur Accident NewsSaamTv
Published On

नागपूर : नागपूरच्या गोवारी उड्डाणपुलावर एक विचित्र अपघात झाला आहे. उड्डाणपुलावरून जाणारी वाहन एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यात 6 गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याने या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. आज सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान हा अपघात झाला.

नागपूर शहरातील गोवारी उड्डाणपुलावर आज (दि.03) झालेल्या एका विचित्र अपघातात 6 गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत. लोकमत चौककडून झिरो माईलकडे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या रस्त्यावर वाहन जात असताना अचानक समोरील एका कारने ब्रेक मारला. त्यानंतर हा ब्रेक अचानक लागल्याने मागून वेगात येणाऱ्या गाड्या एकमेकांवर मागून धडकल्या. अशा सहा गाड्या धडकल्याने या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या सर्व अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, या अपघातात केवळ वाहनांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे.

परशुराम घाटातही भीषण अपघात

रत्नागिरी येथे मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातही भीषण अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक, बस आणि आयशर अशा 4 वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Nagpur Accident News
Pune Crime: पेट्रोल चोरी केल्याचा संशय, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात मंगळवारी (दि.03) एक बस, एक कार, एक ट्रेलर आणि एक आयशर अशा चार गाड्यांचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यात अपघातग्रस्त टेलरवरील कंटेनर देखील रस्त्यावर कोसळला. तर अपघातग्रस्त बस ही घरडा केमिकल कंपनीची असून या बसमधील दहा जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघात ग्रस्त वाहनांनी एक मार्ग पूर्ण ब्लॉक झाला असल्याने परशुराम घाटातील एक लाईन बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

Nagpur Accident News
Sambhajinagar News : भरधाव ट्रकने ट्रॅक्टरसह चार दुचाकींना उडविले; दोघे गंभीर जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com