MPSC ने पेपर आणि मैदानी परीक्षेचे बदलले नियम; महिला आणि तृतीयपंथींना फौजदार होण्यासाठी अशी असेल शारीरिक चाचणी

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीमध्ये अर्हता प्राप्त होण्याकरीता चाचणीमध्ये बदल करण्यात आलेत.
MPSC ने पेपर आणि मैदानी परीक्षेचे बदलले नियम; महिला आणि तृतीयपंथींना फौजदार होण्यासाठी अशी असेल शारीरिक चाचणी
MPSC Exam Saam Tv
Published On

पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी आणि तृतीयपंथींसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीमध्ये पात्र होण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. महिला, तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांच्या शारिरीक चाचणीकरीता लांब उडीची मानकं आणि निकष सुधारित करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्यानुनसार यात सुधारणा करण्यात आली आहे.

शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले आहे. शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होऊन मुलाखतीत पात्र होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण आवश्यक राहतील. पण या गुणांचा या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील महिला, तृतीयपंथी महिला आणि तृतीयपंथी उमेदवारांकरीता शारीरिक चाचणीसाठी धावणे,लांब उडी आणि गोळा फेक असे तीन प्रकार आहेत. त्यात लांब उडीचे अंतर आणि गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आलेत.

उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहणार आहे.उडी मारताना अपघात झाल्यास किंवा चूक झाल्यास म्हणजे उडी मारण्याच्या रेषेवर किंवा रेषेपलीकडे पहिले पाऊल टाकल्यास उमेदवारास एक जादा संधी देण्यात येईल. त्यासाठी गुण कमी केले जाणार नाहीत. जादा संधीचा फायदा घेताना पुन्हा चूक केल्यास वा अपघात घडल्यास उमेदवारास शून्य गुण देण्यात येतील.या तरतूदी सन २०२४ च्या जाहिरातीपासून पुढे होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेकरीता लागू राहणार आहेत. तसेच शारीरिक चाचणीमध्ये खालील बाबींचा समावेश असणार आहे. धावण्याच्या गुणात बदल करण्यात आलेत. धावणे यासाठी उमेदवारास ८०० मीटर (अर्धा मैल) धावावे लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील.

पुलअप्स -

क्षितिज जमिनीच्या समांतर खांबावर उमेदवारास आठ पुलअप्स काढावे लागतील. यासाठी एकूण २० गुण देण्यात येतील म्हणजेच एका पुलअपसाठी २.५ गुण राहतील. उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पुलअप पूर्ण केला असे समजण्यात येईल असे करताना उमेदवाराने न झगडता आणि / अथवा आपले पाय न झाडता किंवा न वाकवता एक पुलअप पूर्ण केल्यास त्यास पूर्ण २.५ गुण देण्यात येतील.

पुलअप्स काढतांना उमेदवारास झगडावे लागले आणि अथवा त्याने आपले पाय झाडले किंवा वाकवले तर एका गुणांपर्यंत गुण कमी होतील.जर उमेदवारास पुलअप काढता आला नाही म्हणजेच त्याला त्याची छाती आडव्या खांबाला टेकवता आली नाही तर त्या पुलअपसाठी त्याला एकही गुण मिळणार नाही. गोळा फेक उमेदवारास ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळा फेकावा लागेल. गोळाफेकीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील

गोळा फेक :

उमेदवारास ४ किलो वजनाचा गोळा फेकावा लागेल. गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाहीत. गोळाफेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. गोळाफेकीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील :

गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये)

लांब उडी यासाठी उमेदवारास धावत येऊन लांब उडी मारावी लागेल.

लांब उडीसाठी खालीलप्रमाणे गुण देण्यात येतीलः- उडीचे अंतर

शारीरिक चाचणीमध्ये खालील बाबींचा समावेश असेल : (१) धावणे यासाठी उमेदवारास ४०० मीटर अंतर धावावे लागेल व त्यास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील :- संपूर्ण ४०० मीटर अंतर धावण्यास लागणारा कालावधी (मिनिटांमध्ये)

MPSC ने पेपर आणि मैदानी परीक्षेचे बदलले नियम; महिला आणि तृतीयपंथींना फौजदार होण्यासाठी अशी असेल शारीरिक चाचणी
MPSC Student protest : एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन; आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com