MPSC Topper: आयुष्यात काही राहायला नको... MPSC मध्ये सोलापूरचा विजय लकमने टॉपर, प्रेरणादायी प्रवास वाचा

MPSC Result 2025 Topper Vijay Lakmane: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये सोलापूरचा विजय लकमने हा राज्यातून पहिला आला आहे.
MPSC Topper
MPSC TopperSaam Tv
Published On
Summary

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

सोलापूरचा विजय लमकनेने पटकावला प्रथम क्रमांक

एकदा नव्हे तर दोनदा केली MPSC क्रॅक

प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)चा निकाल जाहीर झाला. यात सोलापूरचा विजय लमकने हा राज्यातून पहिला आला आहे. सोलापूरच्या लेकाने खूप मेहनतीने हे यश मिळवलं आहे.

MPSC Topper
Success Story: इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन, बीडच्या लेकाने उभारली स्वतःची कंपनी; Canvaला देतेय टक्कर

सोलापूरच्या लेकाची कमाल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला.याज विजय लकमनेने टॉप केले आहे. तो मूळचे सोलापूरातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी आहे. विजय २०२३ मध्येही सिलेक्ट झाले होते. परंतु त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. याबाबत विजय लकमने यांनी स्वतः माहिती दिली आहे. ते म्हणाले की, याआधीही परीक्षा दिली होती. तेव्हाही सिलेक्ट झालो होतो. त्यावेळेस मला सहावा क्रमांक आला होतापण मला उपजिल्हाधिकारी व्हायचं स्वप्न होतं त्यामुळे मी खुश आहे.

विविध पदांवर केले काम

२०२१ ला सुरुवात केली एसटीआय,दुय्यम निबंधक,गटविकास अधिकारी या पोस्टवर काम केले.परंतु आपल्या मनात गिल्ट राहिला नाही पाहिजे की, पुढे भविष्यात जाऊन की प्रयत्न केला असता तर बरं झालं असता. त्यासाठी ही परीक्षा दिली होती. माझ्या स्ट्रॉंग पॉइंटवर मी खेळत आलो आहे.डिस्क्रिप्टिव आणि इंटरव्ह्यू हात नव्हता पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये मी चागला आहे, असं विजय यांनी सांगितले.

MPSC Topper
Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

२०२२ एमपीएससी विनायक पाटील टॉपर होते त्याला मी फॉलो केलं. कमीत कमी सोर्सेस आणि जास्तीत जास्त सराव यामुळे हे यश प्राप्त झाले आहे.अभ्यास किती वेळ करणं हे महत्त्वाचं नाही.फिजिकल क्षमतेने मी सात ते आठ तास अभ्यास करत होतो. राज्यसेवेचा अभ्यास जॉब करत केला आहे. मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावातील आहे.वडील शेती करतात आणि आई गृहिणी आहे.आई वडिलांची इच्छा होती की, पुढे जाऊन काही राहिले नको म्हणायला म्हणून परीक्षा दिली आणि पास झाला. आता डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होणार यात वेळ जाणार आहे. घरची परिस्थिती याचा सारासार विचार करून विचार करून आता विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे.अशक्य काहीच नाही. बुद्धिमत्तेवर सगळं अवलंबून आहे.आई वडिलांचा सपोर्ट चांगला मिळाला आहे. मी जिथे शिकलो तिथे आई-वडील माझ्यासोबत येत होते,असंही त्यांनी सांगितले.

MPSC Topper
Success Story: कॉल सेंटर ते IPS, ८ बँकांच्या परीक्षा केल्या क्रॅक; दोनदा UPSC पास; सुरज सिंह परिहार यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com