
ऑफिस बॉय ते बिझनेसमॅन
दादासाहेब भगत यांनी उभारली स्वतःची कंपनी
डिझाइन टेम्प्लेट कंपनी केली सुरु
इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात. इच्छा असल्यावर तुम्ही आयुष्यात काहीही करु शकतात. तुम्हाला फक्त मेहनत करायची आहे. असंच काहीसं दादासाहेब भगत यांनी केलं. त्यांनी स्वतः च्या जिद्दीवर कंपनी स्थापन केली आहे. महाराष्ट्राच्या लेकाने आपल्या कौशल्याने स्वतः ची कंपनी उभारली आहे. ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या डिझाइन प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.
महाराष्ट्राचे सुपुत्र दादाराव भगत यांनी डिझाइन टेम्प्लेट नावाची कंपनी स्थापन केली आहे. त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे.
एकेकाळी इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून नोकरी
एकेकाळी इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून नोकरी करणारे दादाराव भगत आज बिझनेसमॅन म्हणून ओळखले जात आहे. त्यांनी एकेकाळी इन्फोसिसमध्ये फक्त ९००० रुपये प्रति महिना पगारावर नोकरी केली होती.
महाराष्ट्रातील बीडमधील एका गावात दादाराव भगत यांचा जन्म झाला. त्यांनी डिझाइन प्लॅटफॉर्म बनवले आहे. जे कॅन्व्हा या मोठ्या ब्रँडशी स्पर्धा करते.
दादाराव भगत हे मूळचे बीडचे रहिवासी. त्या भागात नेहमीच दुष्काळ पडतो. त्यामुळे शेती करणे अत्यंत कठीण होते. तसेच त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला महत्त्व नव्हते. त्यामुळे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर आयटीआयचा अभ्यास केला. नोकरी शोधण्यासाठी ते पुण्याता गेले. तिथे त्यांना ४००० रुपये महिना पगारावर नोकरी केली. यानंतर इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम केले. तिथे त्यांना ९००० रुपये मिळायचे.
इन्फोसिसमध्ये ते ऑफिस साफ करणे, छोटी-मोठी कामे करु लागते. त्यांना त्या ऑफिसमधील इतर लोकांना संगणकावर काम करताना पाहून वेगळे वाटायचे. त्यामुळे त्यांनीही अशी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्राफिक डिझाइन आणि अॅनिमेशनचा कोर्स केला. ते एका वर्षात डिझाइनर बनले. यानंतर त्यांनी फ्रिलान्स कामे घेण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी स्वतः ची कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला.
कोविडमध्ये त्यांचे पुण्याचे ऑफिस बंद पडले. परंतु त्यांनी हार मानले नाही. ते गावी गेले आणि तिथे काम करण्यास सुरुवात केली. गावी वीजपुरवठा नसायचा त्यामुळे इंटरनेटचा वेग कमी होता. त्यामुळे त्यांच्या टीमला टेकडीवर गोठ्याजवळ जाऊन काम करावे लागले.
दादाराव यांनी शार्क टँक इंडियामध्ये सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी boAt चे सह-संस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता यांच्याशी करार केला. त्यांनी १ कोटी रुपये गुंतवले. आज डिझाइन टेम्प्लेट ही कॅनव्हा या ब्रँडशी स्पर्धा करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.