Yavatmal Accident: घट्ट धरलेला हात सुटला अन् मुलाच्या डोळ्यांसमोर आई वाहून गेली; यवतमाळमधील मन सुन्न करणारी घटना

Mother Swept Away Front Of Son: गावाजवळील नाल्याला टोगंळ भर पाणी असतांना ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन नाला पार करत होते.
Yavatmal Accident
Yavatmal AccidentSaam TV
Published On

Yavatmal News:

यवतमाळमधून मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. मुलासमोरच त्याच्या आईचा जीव गेलाय. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने आई मुलासमोर वाहून गेलीये. या घटमेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील सायतखर्डा येथील सुमित्रा भाऊराव चौधरी आणि मुलगा भुजंग भाऊराव चौधरी हे दोघेही आपल्या शेतातील काम आटोपून सायंकाळच्या सुमारास घराकडे निघाले होते. यावेळी गावाजवळील नाल्याला टोगंळ भर पाणी असतांना ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन नाला पार करत होते.

Yavatmal Accident
Amravati Crime News : आईला त्यांनी मारलं अन् विहिरीत ढकलून दिले, खूनाचा घटनाक्रम सांगताना पाेलिसांसमाेर मुलगा ढसाढसा रडला

यावेळी अचानक नाल्याला मोठा लोंढा आला आणि क्षणार्धात दोघेही वाहून गेले. काही अंतरानंतर मुलाच्या हातात एका झाडाची वेल सापडली. त्यामुळे मुलगा वाचला परंतु तो आईला काही वाचवू शकला नाही.

झालेल्या आपबितीची माहिती त्याने गावात दिली. त्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. तपासात काही तासांनी आईचा मृतदेह सापडला. घटनास्थळी घाटंजी तहसील प्रशासन व पारवा पोलीस प्रशासनने भेट देऊन शव विच्छेदनाकरीता घाटंजी ग्रामिण रुग्नालय येथे पाठविण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.

Yavatmal Accident
Sameer Wankhede News: अखेर समीर वानखेडेंना दिलासा! आर्यन खान प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष सुटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com