नागपुरात आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन संपवलं जीवन

नागपुरातील (Nagpur) संजय गांधीनगर परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
नागपुरात आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन संपवलं जीवन
नागपुरात आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन संपवलं जीवनSaam Tv
Published On

नागपूर: नागपुरातील (Nagpur) संजय गांधीनगर परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलाच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी घरी कुणीही नसताना संबंधित महिलेले आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (nagpur crime news in marathi)

मेघा कांबळे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव असून त्या नागपूर (Nagpur) शहरातील संजय गांधी नगर परिसरात वास्तव्याला होत्या. मेघा यांनी सोमवारी दुपारी एकच्या सुमारास आपल्या माहेरच्या घरी गळफास घेतला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेघा यांचा परिसरातील सूरज याच्याशी प्रेमविवाह (Love marriage) झाला होता. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यात सुखी संसार होता तसेच त्यांना तीन वर्षांचा एक मुलगा देखील आहे.

नागपुरात आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत गळफास घेऊन संपवलं जीवन
माणुसकीला काळिमा: एका दिवसाच्या चिमुरडीला जिवंत मारुन उकिरड्यावर फेकले

घरच्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांशी विवाह;

दोघेही एकाच वस्तीत राहत होते, यातून त्यांची ओळख झाली. पुढे यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी प्रेमविवाह करण्याच निर्णय घेतला परंतु, घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शविला होता. पण दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांशी विवाह केला होता. गेल्या सहा वर्षांपासून संसार सुरू होता. सूरज पेंटिंगची कामे करत असे, पण सूरजला दारूचे व्यसन असल्याने दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता.

हे देखील पहा -

गेल्या दोन दिवसांपासून ती तणावात होती;

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यामुळे मेघा आपल्या माहेरी आली होती. गेल्या दोन दिवसांपासून ती तणावात होती, याच दरम्यान, दुपारी तिची आई काही कारणास्तव बाहेर गेलेली होती. यावेळी मेघा आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा दोघेच घरात होते. यावेळी मेघाने मुलाच्या डोळ्यादेखत घरातील सिलिंग फॅनला ओढणी लावली आणि गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळात मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तिची आई धावत घरात गेली. त्यांना मेघा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. आईने आरडाओरड केली तेव्हा शेजारी धावून आले. मेघाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com