Nashik : नाशिक हादरले! संपूर्ण कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले, आई-बाप आणि लहान मुलीचा समावेश

Nashik News in Marathi : पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई-बाप आणि मुलीने आयुष्य संपवलेय.
Nashik News in Marathi
Nashik News in Marathi Nashik News in Marathi
Published On

Latest Nashik News in Marathi : नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई-बाप आणि मुलीने आयुष्य संपवलेय. अख्ख्या कुटुंबांने आयुष्य संपवल्यामुळे नाशिकमध्ये खळबळ माजली आहे. आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नाशिक पोलीस याचा तपास करत आहेत. याप्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.

नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये तिघांनी आत्महत्या केली. आई, वडील आणि मुलगी तिघांनी आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली. विजय माणिक सहाने, ज्ञानेश्वरी विजय सहाने, अनन्या विजय सहाने अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावं आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Nashik News in Marathi
Assembly Election: महायुतीच्या जागावाटपाची डेडलाईन ठरली; अमित शहा सोडवणार तिढा?

मिळालेल्या माहितीनुसार, विजय सहाणे हे नाशिकच्या सातपूर येथील मायको कंपनीत काम करत होते. काही वर्षांपूर्वी त्यांची नोकरी गेली होती. त्या काळात त्यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी हाताला मिळेल ते काम करत संसार चालवत होते.

महत्वाची बाब म्हणजे त्यांना पुन्हा मायको कंपनीत नोकरी मिळाली होती, मात्र त्यांना परराज्यात नोकरीला जावे लागणार होते अशी माहिती सहाणे यांच्या नातेवाईकांनी दिलीये.

Nashik News in Marathi
Shiv Sena Split: 'मला काहीतरी सांगायचंय', शिवसेना फुटीची कथा रंगमंचावर; CM शिंदेंवर आधारित नाटकावरून राजकारण तापणार?

इंदिरानगर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलीस याचा तपास करत आहेत. परिसरात याबाबतची चौकशी कऱण्यात येत आहे. आत्महत्याच आहे की हत्या. याचा तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com