Monsoon: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मान्सून आलाय पण पेरणीची घाई नको; कृषी विभागाचं आवाहन

Monsoon Update: बारा दिवसाआधीच मान्सूनने राज्यात आला. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आज लगेच राज्यात मान्सूनचे आगमन झालं आहे.
Monsoon Update:
Monsoon Weather ReportSaam Tv
Published On

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आज लगेच राज्यात मान्सूनचे आगमन झालं. मान्सून आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकरी पेरणीच्या कामांना सुरुवात करतील. परंतु कृषी विभागाने यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. मात्र मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच मंद होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका, असे आव्हान असे आवाहन कृषी विभागानं केलंय.

मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला. मान्सून सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच दाखल झालाय. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार आहे. राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, अशी माहिती कृषी विभागानं दिलीय. सध्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल. तसेच काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल.

मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागातही कोरडे हवामान असेल.साधारण 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता दिसत नाहीये.

दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस पडलाय. आपल्या भागात लवकरच मान्सून दाखल होईल अशा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून केलं जात आहे. राज्यात हवामान कोरडे राहणार आहे आणि जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Monsoon Update:
Pune Rain : पुण्यात रस्त्याची नदी झाली, इनोव्हा वाहून गेली, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

सिन्नरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

सिन्नरतालुक्याला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण झालीय. सिन्नरच्या आठवडी बाजारात शिरले होते. यामुळे व्यापऱ्यांना मोठा फटका बसला. नागरिकांची देखील तारांबळ उडाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com