Monsoon Update: आला रे आला पाऊस आला! मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, तळ कोकणात रिमझिम सरी

Monsoon Arrived In Maharashtra: वाढती उष्णता आणि उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
Monsoon Update: आला रे आला पाऊस आला! मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, तळ कोकणात रिमझिम सरी
Monsoon Update NewsSaam Tv
Published On

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळ कोकणात मान्सूनचे आमगन झाले असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये रिमझिम पाऊस पडत आहे. मान्सून राज्यात दाखल झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड आनंद झाला आहे. राज्यातील इतर ठिकाणी मान्सून कधी पोहचेल याची सर्वजण वाट पाहत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अखेर मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. हवामान विभागप्रमुख डॉ.के. एस होसाळीकर यांनी ट्वीट करत ही आनंदाची माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे तळ कोकणात आगमन झालं आहे. पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. सध्या पाऊस कोकणातील रत्नागिरी, पुढे सोलापूर त्यानंतर बंगालच्या खाडीपासून ते इस्लामपूरपर्यंत पोहचणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Monsoon Update: आला रे आला पाऊस आला! मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, तळ कोकणात रिमझिम सरी
Pune Rain Video: पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ, वाघोलीत रस्त्यावर पाणीच पाणी; वाहनचालकांचे हाल

डॉ. होसाळीकर यांनी सांगितले की, 'काल गोव्यातील मडगावपर्यंत आलेला मान्सून आज राज्यामध्ये दाखल झाला. आज राज्यातील कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे. मान्सून दक्षिण महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. सिंधुदुर्ग पार करत मान्सून रत्नागिरी, त्यानंतर सोलापूर त्यानंतर मेढक आणि बाजूच्या राज्यांपर्यंत जाणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये कोकणात आणि दक्षिण कोकणातील काही भागांसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील चांगला पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.'

Monsoon Update: आला रे आला पाऊस आला! मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, तळ कोकणात रिमझिम सरी
Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात धुवाधार पाऊस, मुबंई - गोवा महामार्गावर साचलं पाणी

राज्यासह देशामध्ये मान्सूनची नेमकी काय परिस्थिती असणार आहे याबद्दल सांगताना डॉ. होसाळीकर यांनी सांगितले की,'संपूर्ण हंगामाच्या पूर्व अनुमानानुसार देशामध्ये चांगला म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. जूनमध्ये मध्य भारतामध्ये त्यामध्ये महाराष्ट्र राज्य देखील येते. याठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळातील मान्सूनबद्दलची सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी देत राहू.'

Monsoon Update: आला रे आला पाऊस आला! मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल, तळ कोकणात रिमझिम सरी
Mumbai News: खळबळजनक! विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com