Bhandara News : भंडाऱ्यातील गणेशपूरमध्ये माकडांचा उच्छाद; हल्ल्यात २ महिला गंभीर जखमी

Monkey Attack on Women : जंगलामध्ये अन्न आणि पाण्याचासाठा शिल्लक नसल्यामुळे माकडांनीव शहरी भागाकडे वळवला आहे. भंडारा शहरातील गणेशपूर येथील गायत्री वार्डमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आगे.
Monkey Attack on Women
Bhandara News Saam TV

शुभम देशमुख

भंडारा शहरातील गणेशपूर येथे माकडांचा उच्छाद सुरू आहे. दोन महिलांना माकडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्यात. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Monkey Attack on Women
Monkey Attack : नेरमध्ये माकडाचा हैदोस; रस्त्याने जाणाऱ्या तिघांवर हल्ला करत घेतला चावा

वाढत्या तापमानाचा परिणाम माणसांसह पशू-पक्ष्यांवरही होत आहे. सद्यस्थितीत जंगलामध्ये अन्न आणि पाण्याचा पुरेसा साठा शिल्लक राहत नसल्यामुळे माकडांनी आपला मोर्चा शहरी भागाकडे वळवला आहे. भंडारा शहरातील गणेशपूर येथील गायत्री वार्डमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आगे.

ही माकडे थेट नागरिकांच्या घरात शिरून त्यांच्या सामानांची नासधूस करत आहेत. तर या माकडांनी गणेशपूर येथील दोन महिलांनाही जखमी केलं आहे.सविता डुंभरे आणि शेंद्रे अशी जखमी महिलांचे नावे आहेत.या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करून जखमी महिलांना भरपाई द्यावी अशी मागणी केली जातेय.

गणेशपूरमध्ये काल झालेल्या हल्ल्यात एका महिलेचं डोकं फुटलं आहे. माकडांनी महलांवर हल्ला केल्यावर तिथे जास्त माणसं उपस्थित नव्हती. त्यामुळे एका महिलेचं थेट डोकं फुटून रक्तस्त्राव होऊ लागला. महिलेने आरडाओरडा केल्यावर अन्य नागरिकांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी माकडांना पळवून लावले आहे.

भंडाऱ्यासह धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा माणसांसह मुक्या प्राण्यांना देखील जानवत आहेत. पाण्याच्या शोधात माकडे शहरात येऊ लागली आहेत. धाराशिव शहराच्या आजूबाजूला राहणारी माकडं पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात शहरात आलीत. अशात काही दिवसांपूर्वी माकडं पाण्याच्या शोधात थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाली. धाराशिव जिल्ह्यात पाणीटंचाई असल्याने जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत.

Monkey Attack on Women
Bhandara News: भंडाऱ्यात भीषण अपघात, 27 मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com