MNS Video : उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील मेळाव्यात राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पाहा VIDEO

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त असताना गोंधळ सुरू असून तणाव निर्माण झाला आहे.
MNS Video
MNS Video Saam Digital
Published On

बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता, त्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले आहेत. ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा घातला आहे. घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ठाकरे यांच्या कारवर शेणही फेकल्याची माहिती आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त असताना गोंधळ सुरू असून तणाव निर्माण झाला आहे.

मनसेच्या जवळपास 40 कार्यकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतला असून गडकरी रंगायतन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. या संपूर्ण गोंधळात उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे मेळाव्याला पोहोचले आहे. येताना राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या फेकल्याची माहिती आहे. संजय राऊत यांनी मेळाव्याच्या व्यासपीठावरून मनसेचा समाचार घेतला आहे.

राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात ते बीडमध्ये असताना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडवत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. कारवर सुपारीही फेकल्या होत्या. त्यानंतर मनसे नेते आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाने सुरुवात केलीय आता शेवट आम्ही करणार, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता. राज ठाकरेंनी आदेश दिला तर आम्ही उद्धव ठाकरे गटाला मातोश्रीच्या बाहेर निघू देणार नसल्याचा इशाराही दिला होता. राज ठाकरे यांनीही आपल्या नादी लागू नका, नाहीतर विधानसभेत एकही सभा होऊ देणार नाही, अशा इशाहा दिला होता.

MNS Video
CM Eknath Shinde : केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभे राहणार! CM एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा; चौकशीचेही दिले आदेश

दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ठाण्यात मेळावा होणार होता. त्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना होती. मेळावा सुरू होण्यापूर्वी मोठ्या संख्येन मनसेचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यात महिला कार्यकर्त्यांही होत्या. कार्यकर्ते मोठ्यासंख्येने जमल्यानंतर त्यांनी अचानक गोंधळ घालायला सुरुवात केली. जोरदार घोषणाबाजी करत ठाकरेंच्या कारवर शेण फेकलं. तसंचे बांगड्याही फेकल्या आहेत. त्यामुळे घटनास्थळी काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच गडकरी रंगायतन येथील मेळाव्यात 2 महिलांना मनसैनिक असल्याच्या संशयावरून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला.

MNS Video
Sunita Williams : सुनीता विल्यम्ससंदर्भात 'बॅड न्यूज'! नासाकडून धक्कादायक खुलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com