MNS News: मुंबई-गोवा महामार्गावर तोडफोड, मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांना अटक

Mangaon News: मुंबई-गोवा महामार्गावर तोडफोड, मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांना अटक
MNS Raigad district president Devendra Gaikwad arrested
MNS Raigad district president Devendra Gaikwad arrested Saam Tv
Published On

Mangaon News: मनसेच्या रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर माणगावमध्ये महामार्ग बांधकाम ठेकेदाराचे ऑफीस तोडल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना शुक्रवारी माणगाव कोर्टात हजार करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

पनवेलमध्ये राज ठाकरे यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. यानंतर मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी तोडफोड केली होती. मांगावमधील चेतक सन्नी कंपनीचं कार्यलय त्यांनी फोडलं होतं.

MNS Raigad district president Devendra Gaikwad arrested
Pune Crime News: पुण्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, राड्यात एकाचा मृत्यू...

दरम्यान, बुधवारी पनवेल येथे राज ठाकरे यांच्या सभा पार पडली. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला कळत नाही ते चांद्रयान चंद्रावर का पाठवलं आहे. (Latest Marathi News)

ते म्हणाले की, चांद्रयानाचा आपल्याला काय उपयोग आहे. तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत तर ते यान महाराष्ट्रात सोडायचं ना.

MNS Raigad district president Devendra Gaikwad arrested
Kalyan News: कल्याणमध्ये भाजप-शिवसेना पुन्हा समोरासमोर, भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या नेत्यामध्ये हमरीतुमरी; काय आहे प्रकरण?

राज्यातील लोकांचं मला कौतुक वाटतं. २००७-०८ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. आतापर्यंत येथे १५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. पण रस्ता आहे तसाच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com