मुंबई - राज्य सरकारने State Governmnet कोरोनामुळे Corona दहीहंडी Dahihandi उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजप आणि मनसेनेने विरोध केला आहे. ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणारच असे मनसेने सांगितले होते.
यामुळे पोलिस बंदोबस्त असून देखील मनसेने ठाणे Thane, मुंबई Mumbai यासोबत ठिकठिकाणी दहीहंडी उभारून दहीहंड्या फोडल्या. ठाण्यात जन्माष्टमीचे औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंड्या फोडल्या. कुठे तीन तर कुठे चार, पाच थर लावून मनसैनिकांनी दहीहंडी फोडत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
हे देखील पहा -
रात्री १२ वाजता मनसेने ठाण्यात दही हंडी फोडली. त्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती परंतू रात्री २ च्या सुमारास त्यांना तात्काळ जामिनावर सुटका देखील झाली आहे. हिंदू सणांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असे मनसेने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचे नियम पायदळी तुडवत हंडी फोडण्यात आली. यावेळी अभिजीत पानसे आणिअविनाश जाधव यांची पोलिसांच्या बरोबर थोडी झटापट झाली. भगवती शाळेच्या मैदानामध्ये ही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी जवळपास २५० कार्यकर्ते त्या ठिकणी उपस्तिथ असल्याची माहिती समोर आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.