Raj Thackeray News:...तोपर्यंत राजकारणी वठणीवर येणार नाहीत; राज ठाकरे कडाडले

Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरून टीकास्त्र सोडलं आहे.
Raj Thackeray Latest News
Raj Thackeray Latest NewsSaam TV
Published On: 

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील घडामोडींवरून राजकीय नेत्यांवर आगपाखड केली आहे. 'कुणाच्या हातात काही राहीलं नाही, अजूनही निवडणुका होत नाहीत. लोक मोबाईल फोनवर राग व्यक्त करतात आणि शांत होतात. पण लोक रस्त्यावर येणार नाहीत, तोपर्यंत राजकारणी वठणीवर येणार नाहीत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवरून टीकास्त्र सोडलं आहे. (Latest Marahi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. काल राज ठाकरे हे चिपळूण येथे गेले होते. त्यावेळी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संवाद साधताना कार्यकर्त्यांना संघटना बांधणीच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर राज ठाकरे आज दापोलीत असून यावेळी प्रसार माध्यामांशी बोलताना राज्यातील परिस्थितीवरून राजकीय नेत्यांवर सडकून टीका केली.

Raj Thackeray Latest News
Baipan Bhari Deva Raj Thackeray Connection : राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरेंचं ‘बाईपण भारी देवा’सोबत खास कनेक्शन; दिग्दर्शकांनीच शेअर केला किस्सा

राज्यातील राजकीय पस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, 'लोकांच्या मनात संताप आहे. या गोंधळाच्या आधीच माझा कोकण दौरा ठरला होता. हा गोंधळ झाला म्हणून दौरा केला नाही. पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करायचे होते, ते झाले आहेत. कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी सूचना दिल्या आहेत'.

'निवडणुकीआधी कुणाबरोबर युती आणि नंतर कुणाबरोबर जातात. मी या प्रकारची प्रतारणा करणार नाही. राजकारणी कसे रंग बदलतात, याकडे लोकांनी बघणे गरजेचे आहे. मी व्याभिचारी राजकारण करणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Latest News
Supreme Court Assembly Speaker Notice: १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

'कोकणातील जनतेनं विचार केला पाहीजे. त्याच-त्याच पक्षांना निवडून दिल्यानं काय झालं, याचा अंदाज येत नसेल तर भीषण आहे. गलिच्छ राजकारण सुरु आहे. कुणाच्या हातात काही राहीलं नाही, अजूनही निवडणुका होत नाहीत. लोक रस्त्यावर येणार नाहीत, तोपर्यंत राजकारणी वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्रात जे सुरु आहे, ते पाहून मी कुणासोबत जाणार नाही, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com