Shrikant Thackeray Song In Baipan Bhari Deva : बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केदार शिंदे यांच्या या चित्रपटाचं राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचे खास कनेक्शन आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एका पोस्टमध्ये त्याविषयी सविस्तर सांगितले आहे.
केदार शिंदे त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या "उघड्या पुन्हा जाहाल्या" या गाण्याविषयीचा एक किस्सा शेअर केला आहे. चित्रपटामध्ये "उघड्या जाहाल्या" पुन्हा हे गाणे वापरले आहे. हे गाणे जसे आहे तसेच वापरण्यात आले आहे. केदार शिंदे यांचे म्हणणे आहे की, जर या गाण्यात बदल केले असते तर ते तितकं अपील झालं नसत. (Latest Entertainment News)
केदार शिंदे यांची पोस्ट
बाईपण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'बाईपण भारी देवा'मध्ये खरंतर चार गाणी. त्यातलं टायटल व पिंगा ही कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅड सॅांग आहे... स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं.. "उघड्या पुन्हा जाहाल्या".
नवं गाणं करायचं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं. असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. हे गाणं गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी. कमाल गायलय. आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार? लवकरच..
आणि... शेवटचं गाणं. "मंगळागौर" ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात. पण सिनेमात ते गाणं ३-४ मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र कमाल गायली आहे.
त्याची सुरूवातीची आरतीने ज्या सुकूनने केली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तीचा आवाज घरंदाज वाटतो. सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटरमध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान खुप मोठं आहे.
बाईपण भारी देवा चित्रपटाला प्रदर्शित होऊन १४ दिवस झाले आहे. १४ दिवसात या चित्रपटाने ३६. ७८ कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपटाला वेग्वेगळ्या स्थरातून प्रतिसाद मिळत आहे. सात बहिणींच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब यांनी या अभिनेत्री या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.