MLC Election: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजप सज्ज; 'प्रचारपेक्षा नियोजन हवं', कार्यकर्त्यांना फडणवीसांचा सल्ला

Devendra Fadnavis : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीचा विजय संकल्प मेळावा पार पडला. कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिलाय.
MLC Election: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजप सज्ज; 'प्रचारपेक्षा नियोजन हवं', कार्यकर्त्यांना फडणवीसांचा सल्ला
Devendra FadnavisSaam Tv

ठाणे: लोकसभा निवडणुकीत कोकणा महायुतीला मोठं यश मिळालं. ज्यांनी महायुतीला हटाव अशी घोषणा दिली, कोकणवासीयांनी त्यांनाच कोकणाच्या बाहेर काढलं. यामुळे कोकण पदवीधर निवडणुकीतही पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद असेल, असं प्रतिपादन भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महायुतीचे उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास करताना फडणवीसांनी यांनी मतं मिळण्याचा मंत्र सांगितलाय. ते महायुती विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.

ठाण्यात पार पडलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीसांना महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या कामाचे कौतुक केलं. निरंजन डावखरे हे सर्वाना जिंकणारे उमेदवार आहेत. डावखरेंनी १२ वर्ष प्रतिनिधित्व केलंय. त्यांनी जनसामान्यांचे प्रश्न मांडलेत. ते जागरूक आमदार आहेत. जुन्या पेन्शनसाठी समिती तयार केली आणि तोडगा काढला. पेन्शन अणि त्यांचे भत्ते मिळतील असे काम केलं आहे. २००५ पूर्वीचे शिक्षकांचे प्रश्न देखील सोडविलेत, असं म्हणत फडवीस यांनी डावखरेंच्या कामांची माहिती दिली.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत चांगले मतदान होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास जरी वर्तवला असेल तरी मतं मिळवण्यासाठी आपला कस लागणार असल्याचं सांगितलं. कारण ही निवडणूक लोकसभेसारखी प्रचार करणारी नाही तर नियोजन करणारी आहे. ही निवडणूक नियोजनाची निवडणूक आहे. प्रत्येक मतदाराला भेटून हार्ट तु हार्ट मतदान करायचे आहे.

मतदार आपल्याला गठ्ठ्याने सापडत नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात. काही ऑफिस असतात, काही संस्थांमध्ये आढळतात, काही महाविद्यालयात असतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल, तसेच त्यांना आपण मतदान केंद्रापर्यंत कसं आणायचं हे दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जो जाहीरनामा तयार केलाय तो प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचला पाहिजे.

हा जाहीरनामा पोहोचवण्यासाठी आपल्याला प्रचार सभा, रॅली, काढायची नाहीये. ही निवडणूक मॅन टू मॅन आणि हर्ट टू हर्ट अशा प्रचाराच्या माध्यमातून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. ९८ टक्के मतदार हे ठाणे जिल्ह्यात आहेत तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या दीड ते दोन लाखाच्या घरात आहे, त्यामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यावर मोठी जबाबदारी आहे.येथे जास्तीत जास्त मतदान घडवून आणू तेवढा मोठा आपला विजय होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

MLC Election: कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजप सज्ज; 'प्रचारपेक्षा नियोजन हवं', कार्यकर्त्यांना फडणवीसांचा सल्ला
MLC Election: शिक्षक-पदवीधर मतदार संघ निवडणुकीत अजित पवार गटाची एन्ट्री; उद्या करणार उमेदवाराची घोषणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com