आमदार संजय शिंदे यांनी काढले १५०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज ?

करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे.
आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
आमदार संजय शिंदे यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलनसागर आव्हाड
Published On

पुणे : पंजाब नॅशनल PNB बँकेसमोर Bank आज करमाळयामधील शेतकऱयांनी Farmers आक्रमक होत, भीक मागत अर्धनग्न आंदोलन केले आहे. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्जे उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. MLA Sanjay Shinde takes out bogus loans in the name of 1500 farmers

जर आमदार संजय शिंदे वर कारवाई झाली नाही तर ईडी ED कार्यालयासमोर उपोषण Fast करण्याचा इशारा आंदोलक शेतकरी अतुल खूपसे यांनी दिला आहे. करमाळ्याचे Karmala आमदार संजयमामा शिंदे यांच्या मालकीच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावावर बोगस Bogus कर्ज उचलण्यात आली आहेत.

हे देखिल पहा

शिवाय काढलेली कर्ज वेळेत न भरल्याने ती कर्ज भरण्यासंदर्भात पुण्यातील Pune कोथरूडमधील Kothrud पंजाब नॅशनल बँकेने वकिलांमार्फत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा पाठवायला सुरुवात केलीय. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे, पुणे कॅम्पमधील पंजाब नॅशनल बँकेच्या विभागीय कार्यालयासमोर या शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे.

या विषयी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बँक मॅनेजरशी Manager संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, मॅनेजरने कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिला नाही व कोणतेही उत्तर न देता मॅनेजर निघून गेल्याच आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून मागितलेली भीक बँकेला व आमदार MLA संजय शिंदेंना Sanjay Shinde देण्यात येणार असल्याची माहिती अतुल खूपसे Atul Khupse यांनी दिली आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com