Bhandara News: राष्ट्रवादीच्या आमदाराकडून सरकारी महिला कर्मचाऱ्याला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप; काय आहे प्रकरण?

Bhandara News: आमदार राजू कारेमोरे यांनी शासकीय महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख

Raju karemare News:

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांनी शासकीय महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. यानंतर आज आमदारांचा निषेध करत काळ्या फिती लावून नारेबाजी केली आहे. (Latest Marathi News)

तुमसर विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची कारकीर्द नेहमी चर्चेत राहिली आहे. तुमसर पोलीस ठाण्यात जाऊन केलेली शिवीगाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च शब्दात केलेली दमदाटी या प्रकारानंतर तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांची आणखी प्रकार पुढे आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara News
Manoj Jarange : जरांगेंचं उपोषण मागे, तरीही काही ठिकाणी आंदोलन सुरूच; मुंबई- आग्रा महामार्ग रोखला

आता एका शासकीय महिला कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे. या विरोधात तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केलं. तसेच आमदार राजू कारेमोरे यांचा निषेध व्यक्त केला आहे.

जिल्हा चिकित्सक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेण्याकरिता २८ ऑक्टोबरला आले होते. या बैठकीत महिला परिचारिकेला जाब विचारताना कारेमोरे यांनी शिव्यांचा भडीमार केला.

इतकेच नव्हे तर कक्षसेवक भरत मानकर यांना दोनदा मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर यांची तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे या घटनेची तक्रार दाखल केली.

Bhandara News
Rajasthan Politics, ED: राजस्थानात २५ ठिकाणी ED चे छापे; नेते, अधिकारीही रडारवर?

तर आज काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत आमदार माफी मागणार नाही, तो पर्यंत निषेध करत राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

तर या संदर्भातील आमदार यांना विचारणा केली असताना आमदारांनी सांगितले की, तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रेफर टू भंडारा केला जातो. रुग्णांना सेवा दिली जात नाही. या संदर्भात विचारणा केली आहे. कुठलेही अपशब्द वापरले नाही. आमदार कारेमोरे यांची कारकिर्दी नेहमी वादग्रस्त राहिली आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होते, ते पहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com