'माझ्या मागं एकनाथ अन् देवेंद्र आहेत, मी काेणाला घाबरत नाही'

आज राज्यातील एकेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल समजताच नेत्यांचे सर्मथक जल्लाेष करताना दिसत आहेत.
eknath shinde , devendra fadnavis , gram panchayat election result 2022, satara , khed
eknath shinde , devendra fadnavis , gram panchayat election result 2022, satara , khed saam tv

Gram Panchayat Election Result 2022 : सातारा जिल्ह्यात सर्वात महत्त्वाची मानली जाणाऱ्या खेड ग्रामपंचायतीवर अखेर आमदार महेश शिंदे (mahesh shinde) गटानं वर्चस्व सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गटानं झेंडा राेवला आहे. जनतेने आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) गटास पराभवाचा धक्का दिला आहे.

सातारा जिल्ह्यात सहा ग्रामपंचायतीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची समजली जाणारी खेड ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. यामध्ये महेश शिंदे गटाला बारा जागा मिळाल्या आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांना मात्र पाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

eknath shinde , devendra fadnavis , gram panchayat election result 2022, satara , khed
हा तर राष्ट्रवादीचा बशा बैल, त्याला बदलण्याची गरज; भाजप आमदाराची ज्येष्ठ नेत्यावर टीका

या विजयानंतर आमदार महेश शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लाेष केला. आमदारांना खांद्यावर घेत विजयाच्या घाेषणा दिल्या. यावेळी माध्यमांशी बाेलताना आमदार महेश शिंदे यांनी खेडवासीयांचे आभार मानले.

ते म्हणाले दोन खासदार आणि तीन आमदारांनी मला पाडण्यासाठी ताकद लावली होती. मात्र याचा परिणाम झाला नाही. कारण माझ्या मागे एकनाथ आणि देवेंद्र यांची ताकद आहे. त्यामुळे मी काेणालाही घाबरत नाही. हे दाेन्ही नेते केवळ माझ्याच नव्हे तर सामन्यांच्या पाठीशी असल्याचे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

eknath shinde , devendra fadnavis , gram panchayat election result 2022, satara , khed
Gram Panchayat Election Result 2022 : काँग्रेसचा हात भारी; राष्ट्रवादीसह सेना, शिंदे गट भुईसपाट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com