Bacchu Kadu News: आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर प्रहार; म्हणाले, "१७ रुपयांच्या साडीचे वाटप करून..."

Bacchu Kadu vs Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांनी वाटप केलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी केली. यावरून आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर प्रहार केला आहे.
MLA Bacchu Kadu slam Rana couple
MLA Bacchu Kadu slam Rana coupleSaam TV

MLA Bacchu Kadu slam Rana couple

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप केले होते. मात्र, या साड्या आहेत की मच्छरदान्या असा संतप्त सवाल आदिवासी महिलांनी केला. इतकंच नाही, तर या साड्या आमच्या अब्रुची इज्जत काढणाऱ्या आहेत, असं म्हणत आदिवासी महिलांनी साड्यांची होळी केली. यावरून आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर प्रहार केला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MLA Bacchu Kadu slam Rana couple
Bachchu Kadu News : अमरावतीत बच्चू कडूंची राजकीय धुळवड; शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरलं

आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर प्रहार

"मेळघाटातील आदिवासी महिलांना मी सलाम करतो. त्यांना माझा मानाचा मुजरा आहे. १७ ते २० रुपयांच्या साडीचे वाटप करून लोकशाहीचे पतन करणारी लोक काही तयार होत असेल, तर त्याच पतन-हनन आपण केलं पाहिजे" अशी टीका बच्चू कडू यांनी केली.  (Latest Marathi News)

"त्या लोकांना खांद्यावर घेऊन नाचावं असं मला वाटतं. कारण, सध्या पैसा आणि सत्ता हे समीकरण झालं आहे. त्यामुळे बिगर पैशांचा कार्यकर्ता आता निवडणुकीतून हद्दपार होतोय की काय याची भीती वाटते, म्हणून त्यांना मी मानाचा मुजरा अर्पण करतो, असं म्हणत बच्चू कडू यांनी आदिवासी महिलांचं कौतुक केलं आहे. (Maharashtra Politics News)

आदिवासी महिलांकडून साड्यांची होळी

नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघात होळी महोत्सवानिमित्त आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप केले होते. त्यावेळी आदिवासी महिलांकडून या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. राणा दाम्पत्याने वाटप केलेल्या साड्या आमच्या अब्रुची इज्जत काढणाऱ्या आहेत, असा संताप महिलांनी व्यक्त केला.

इतकंच नाही, तर नवनीत राणांनी वाटप केलेल्या साड्यांची आदिवासी महिलांनी होळी देखील केली. आम्ही आदिवासी आहोत म्हणून काहीही परिधान करू असं तुम्हाला वाटलं का? आमच्या मतावर राज्य करून इतके दिवस सत्ता उपभोगलात, पण आता यानंतर या मेळघाटमध्ये तुम्ही मत मागायला अजिबात येऊ नका. तसेच पुन्हा सत्तेत यायचं स्वप्न विसरून जा, असा संताप आदिवासी महिलांनी व्यक्त केला.

MLA Bacchu Kadu slam Rana couple
Solapur News: शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा; हॉटेल मॅनेजरला मारहाण करून मोबाइल हिसकावल्याचा आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com