Solapur News: शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा; हॉटेल मॅनेजरला मारहाण करून मोबाइल हिसकावल्याचा आरोप

Solapur Breaking News: शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनिष काळजे पुन्हा एकदा गोत्यात सापडले आहे.
Solapur Shiv Sena News
Solapur Shiv Sena NewsSaam TV

Solapur Shiv Sena News

शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनिष काळजे पुन्हा एकदा गोत्यात सापडले आहे. एका हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी काळजे यांच्यासह त्यांच्या चालकाविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे अशी कोणतीच घटना घडली नसल्याचं मनीष काळजे यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Solapur Shiv Sena News
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढणार? तुरुंगातून दिलेल्या 'त्या' आदेशाची ईडी करणार चौकशी

शिवसेना संपर्क कार्यालयाच्या गेटसमोर वाहन लावल्याच्या कारणावरून रविवारी (ता. २४) काळजे यांचा हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की काळजे यांनी हॉटेल मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.

यासंदर्भात तक्रारदारांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. यामध्ये काळजे यांनी जाणीवपूर्वक आपल्याला मारहाण करत मोबाइल हिसकला असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Breaking Marathi News)

दुसरीकडे काळजे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. सदर हॉटेल चालक हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या सांगण्यावरून हा खोटा गुन्हा दाखल झाला आहे, असं काळजे यांनी म्हटलं आहे.

मुळात शिवसेना संपर्क कार्यालयाबाहेरील हे हॉटेल अतिक्रमण जागेत असल्याने भीतीपोटी हॉटेल चालकांनी गुन्हा दाखल केल्याचं काळजे यांनी म्हटलं आहे. या हॉटेलसोबतच काँग्रेस भवन बाहेर देखील अतिक्रमण करून हॉटेल थाटण्यात आल्याचा आरोप जिल्हाप्रमुख काळजे यांनी केलाय.

Solapur Shiv Sena News
Weather Forecast: सावधान! पुढील ४८ तासांत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; IMD कडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com