वाशिम जिल्ह्यात तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेला बिहारचा तरुण जयपाल सापडला
पोलिसांनी गुगल मॅप आणि व्हिडिओ कॉलच्या मदतीने कुटुंबाशी संपर्क साधला
मुलाला जिवंत पाहून कुटुंबातील सदस्य भावुक झाले
पोलिसांनी जयपालला सुरक्षितपणे बिहारला रवाना केले
वाशिम च्या कारंजा पोलीस स्टेशनमध्ये एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला आहे. बिहार राज्यातील एक तरुण तीन महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबियांना वाटलं त्याचा मृत्यू झाला. मात्र तीन महिन्यानंतर परिवाराने मोबाईलवर जेव्हा तरुणाचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. दरम्यान पोलिसांनी या तरुणाला त्याच्या घरी सुरक्षितरित्या रवाना केले आहे. या तरुणाचे नाव जयपाल असून तो मूळचा बिहारचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपासून जयपाल हा त्याच्या घरच्यांपासून दुरावला होता. कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र तो सापडला नसल्याने त्यांनी जयपाल हयात नसल्याचे अंदाज लावले. मात्र मानोरा वनपरीक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान जंगलात एक तरुण भटकंती करताना आढळला. संशय आल्याने त्यांनी त्याच्याशी संवाद साधला असता त्याने आपले नाव जयपाल असल्याचे सांगितले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पोलिस स्टेशन कारंजा शहर येथे आणले असता कर्तव्यावर हजर असलेले पोलिस शिपाई विजय गंगावणे यांनी त्याची मानसिक स्थिती समजून घेऊन त्याच्या अस्पष्ट बोलण्यातून गावाचे नाव समजले. फक्त गावाच्या नावावरून गुगल मॅप या सहाय्याने तेथील पान शॉप या बोर्ड वरील मोबाईल क्रमांकावर कॉल करून बस्ती समारा गावातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मिळाला. बिहार राज्यातील बजरंग चौक, जिल्हा बत्तीसअमरा येथील त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला.
यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे आई-वडिलांशी बोलण्याची सोय केली. मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्या मुलाला जिवंत पाहताच कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तीन महिन्यांपासून मृत समजलेल्या मुलाला जिवंत पाहताच संपूर्ण कुटुंब भारावून गेले. दरम्यान, जयपालला कारंजा येथील स्थानिक नागरिक सलमान मेमन यांनी पोलिस कर्मचारी विजय गंगावणे याच्या सहकार्याने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षितपणे बिहारला रवाना केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.