
ठाणे : भाईंदर पूर्व येथील गोल्डनेस्ट परिसरातील मनपा संचलित दिवंगत गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्वीमिंग पूलमध्ये आठ दिवसांपूर्वी ११ वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता त्याच्या मृत्यूबाबत एक मोठी अपडेट समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. नऊ वर्षीय मृत ग्रंथने स्वीमिंग पूलमध्ये पोहताना त्याला दिलेलं जीवरक्षक साधन काढून टाकले होते, असा आश्चर्यकारक खुलासा तरण तलावाच्या कंत्राटदाराने केला आहे. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या ग्रंथच्या स्वतःच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचं कंत्राटदाराने उपरोधिक म्हटलं आहे.
ग्रंथ हा नेहमीप्रमाणे सकाळी पोहण्यासाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये गेला होता. काही वेळातच तो पाण्यात दिसेनासा झाला. परंतु त्या वेळी पूल परिसरात उपस्थित प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर लक्ष न दिल्यानं कुणालाच तो नसल्याचं जाणवून आलं नाही. काही वेळाने तो पाण्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर तातडीने त्याला भाईंदरमधील तुंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं.
दरम्यान, मिरा-भाईंदर पालिकेने या मृत्यूप्रकरणी व्यवस्थापक कंत्राटदाराला नोटीस बजावली होती. त्यावर त्याने आता आश्चर्यकारक खुलासा सादर केला आहे. यात त्याने त्याच्याकडून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, मृत ग्रंथने पोहताना त्याला दिलेले जीवरक्षक साधन काढून टाकलं होतं. पालिकेसोबत झालेल्या करारानुसार सुरक्षा उपाययोजना, जसं की प्रशिक्षित जीवरक्षकाची नियुक्ती, सुरक्षा उपकरणांची उपलब्धता आणि उपकरण तपासणी आदी कार्यवाही करण्यात आल्याचं कंत्राटदाराने म्हटलं आहे.
याशिवाय ही घटना रविवारी घडली, तेव्हा स्वीमिंग पूलजवळ चार जीवरक्षक उपस्थित होते. तलावात पोहणाऱ्या सर्वांना तरंगण्याचे जीवरक्षक साधन (फ्लोटेशन एड्स) त्यांच्याकडून दिली गेली होती. तसेच ते सर्वांनी लावलं होतं का? याची खातरजमा जीवरक्षकांकडून केली जात होती. मात्र, ग्रंथने स्वतःहून फ्लोटर बाहेर काढून ठेवत, तो तलावात पोहण्याकरता उतरला, असं यात नमूद केलं आहे. यावरून जीवरक्षकाने ग्रंथ हा तलावात सुरक्षा साधनांविना उतरून पोहोत असल्याच्या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न होतं.
मात्र, तरीही कंत्राटदाराकडून आश्चर्यकारकरीत्या मृत्यूला ग्रंथची चूक कारणीभूत असल्याचं खुलाशात भासवलं जात आहे. त्या आधारे कंत्राटदाराकडून कंत्राट रद्द करण्यासारखी कारवाई न करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. ग्रंथने गेल्यावर्षी पोहण्यासाठी आयोजित केलेल्या शिबिरातही प्रवेश घेतला असल्याची माहिती खुलाशात देत त्याला तलाव आणि पोहण्याची माहिती असल्याचं कंत्राटदाराकडून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.